शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तापमानात वाढ;  विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 20:46 IST

राज्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली असून थंडी पळाली उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील अनेक शहरात किमान तापमानात उल्लेखनीय वाढ

ठळक मुद्देमध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ अफगाणिस्तान, पाकिस्तान दरम्यान वातावरणात चक्रवात स्थिती उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील अनेक शहरात किमान तापमानात उल्लेखनीय वाढ

पुणे : उत्तर भारतातील अनेक राज्यात अवकाळी पाऊस झाला़. तसेच अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली असून थंडी पळाली आहे़. १२ व १३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १२़४ अंश सेल्सिअस नोंदविले़. अरबी समुद्रावरुन पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर हवेचा जोर असून हे वारे आपल्याबरोबर बाष्पही घेऊन येत आहे़. त्यामुळे राज्यातील तापमानात गेल्या दोन दिवसात वाढ झाली आहे़. त्याचबरोबर अफगाणिस्तान, पाकिस्तान दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे़. राजस्थानच्या वर चक्रवाताची स्थिती बनली आहे़. त्यामुळे राजस्थानसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी बर्फवृष्टी तसेच पाऊस पडत आहे़. तसेच बंगालच्या खाडीहून दक्षिणेच्या बाजूने बाष्पयुक्त वारे येत आहे़. त्याचा परिणाम राज्यातील तापमान वाढीवर झाला आहे़. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़ तर कोकणात २ ते ४ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे़. उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील अनेक शहरात किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे़. विदर्भात किमान तापमानात किंचित वाढ नोंदविली आहे़. १२ डिसेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. इशारा : १२ व १३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ़़अफगाणिस्तान, पाकिस्तान दरम्यान वातावरणात चक्रवात स्थिती बनली आहे़. तसेच बंगालच्या खाडीतून दक्षिणेच्या बाजूने बाष्पयुक्त वारे वाहत आहे़. त्याचा जोर अधिक असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्याकडे येणे बंद झाले आहे़. तसेच राज्यात अंटी सायक्लोन स्थिती निर्माण झाली आहे़. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ आहे़. दक्षिणेकडून येणाºया वाºयांमुळे विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे़ . ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामान