शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान न्याय हवा

By admin | Updated: January 8, 2017 00:39 IST

माजी मंत्री व शिक्षणसम्राट कमल किशोर कदम यांच्या महात्मा गांधी मिशनने केलेल्या तीन अपिलांवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे सहाव्या वेतन

मुंबई : माजी मंत्री व शिक्षणसम्राट कमल किशोर कदम यांच्या महात्मा गांधी मिशनने केलेल्या तीन अपिलांवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे सहाव्या वेतन आयोगाच्या संबंधीचे निर्णय राज्यघटनेतील समानतेच्या निकषांवर तपासून पाहिले व ते समानांना वागणक देणारे असल्याने पक्षपाती आणि घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला. सरकारचे निर्णय रद्द केले तर त्याचे लाभ कोणालाच मिळणार नाहीत. म्हणून ते रद्द न करता त्यांचा लाभ अनुदानित व विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान न्यायाने मिळायला हवेत, असे स्पष्ट केले.न्या. जस्ती चेलमेश्वर व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. ज्या विनाअनुदानित कॉलेजांमध्ये सहावा वेतन आयोग लागू केलेला नाही तेथे तो या निकालाने आपोआप लागू होईल, असे नाही. मात्र तेथील कर्मचारी उच्च न्यायालयात याचिका करून याआधारे अनुकूल आदेश नक्की मिळवू शकतील.महात्मा गांधी मिशनतर्फे औरंगाबाद येथे (जवाहरलाल नेहरु) व नांदेड येथे अभियांत्रिकी महाविद्यालये चालविली जातात. तेथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिका मंजूर करून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेब्रुवारी २०१२ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेली कारणमीमांसा सर्वोच्च न्यायालयाने सदोष ठरविली तरी वेगळ््या निकषांच्या आधारे तो निर्णय कायम ठेवला.आम्हाला सरकारकडून अनुदान मिळत नाही. विद्यार्थ्यांकडून मिळणारी फी एवढेच आमचे उत्पन्नाचे साधन आहे व ही फीसुद्धा सरकारने नेमलेली शुल्क नियंत्रण समिती ठरवून देते. त्यामुळे सहावा वेतन अयोग लागू करणे परवडणारे नाही, असे संस्थेचे म्हणणे होते. परंतु न्यायालयाने म्हटले की, वेतनवाढ लागू केल्यावर शुल्क नियंत्रण समितीकडून त्यानुसार फीमध्ये सुधारणा करून घेणे शक्य आहे. (विशेष प्रतिनिधी)