शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात टीबीचे १ लाख ३६ हजार रुग्ण

By admin | Updated: September 19, 2015 03:33 IST

हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. राज्यात १ लाख ३६ हजार क्षयरोगाचे रुग्ण आहेत. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात

मुंबई : हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. राज्यात १ लाख ३६ हजार क्षयरोगाचे रुग्ण आहेत. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात अशा आजारांचा संसर्ग झपाट्याने होतो. क्षयरोगाची लागण रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. क्षयरोग रुग्णांचे निदान व्हावे, त्यांना उपचार मिळावेत यासाठी रोटरी क्लबने ‘टीबी भगाओ’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ४ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातील पहिले शिबिर १३ सप्टेंबर रोजी रोटरी फाउंडेशनच्या क्षयरोगतज्ज्ञ डॉ. डेनिस अड्डो यांच्या उपस्थितीत भरविण्यात आले होते. पुढच्या एका वर्षात एकूण ३ हजार १४० शिबिरांचे आयोजन मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, डहाणू, पालघर आणि नवी मुंबईमधील ११० रोटरी क्लबद्वारे करण्यात येणार आहे. क्षयरोगाच्या बरोबरीनेच फुफ्फुसाला होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी क्लबकडून ठोस उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये रुग्णांचे क्षयरोग निदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने एक्स-रे काढण्यात येईल. ज्यांना क्षयरोगाचा धोका असल्याचे निदान होईल त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात येईल. शिबिरांच्या बरोबरीने टीबीविषयक जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. प्रमोद लेले आणि डॉ. श्रीपाद बोडस यांनी सांगितले की, मुंबईत फुफ्फुसाच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. एका शिंकण्यातून क्षयाचे ४० हजार जीवाणू बाहेर पडतात. याविषयी जनजागृती करून क्षयाला रोखण्यासाठी रोटरी क्लबने ही मोहीम सुरू केली आहे. (प्रतिनिधी)