Shirdi: गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर टाटा मोटर्सकडून २५.६९ लाखांची अलिशान कार साई चरणी दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:39 IST2026-01-22T14:37:02+5:302026-01-22T14:39:17+5:30

Shirdi Saibaba Sansthan: आज गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर टाटा मोटर्स पुणे रिजनच्या सर्व डीलर्सतर्फे श्री साईबाबा संस्थानला २५ लाख ६९ हजार १९३ किमतीची टाटा सिएरा कार दान करण्यात आली. संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करून चावी स्वीकारण्यात आली.

Tata Sierra Donated to Shirdi Saibaba Sansthan; Pune Region Dealers Offer 25.69 Lakh SUV on Ganesh Jayanti | Shirdi: गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर टाटा मोटर्सकडून २५.६९ लाखांची अलिशान कार साई चरणी दान

Shirdi: गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर टाटा मोटर्सकडून २५.६९ लाखांची अलिशान कार साई चरणी दान

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या चरणी जगभरातील भक्त आपापल्या श्रद्धेनुसार दान अर्पण करत असतात. आज गणेश जयंतीच्या पवित्र मुहूर्तावर टाटा मोटर्स, पुणे रिजनमधील सर्व डीलर्सच्या वतीने साईबाबा संस्थानला २५ लाख ६९ हजार १९३ रुपये किमतीची टाटा सिएरा ही आलिशान कार देणगी म्हणून देण्यात आली आहे.

आज शिर्डी येथे या नवीन वाहनाचे विधीवत पूजन करण्यात आले. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि टाटा मोटर्सच्या विविध डीलर्सच्या हस्ते हे पूजन संपन्न झाले. विधीवत सोहळ्यानंतर टाटा मोटर्सच्या वतीने गाडीची चावी अधिकृतरीत्या संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली. साईबाबा संस्थानला मिळालेल्या या अनपेक्षित आणि मौल्यवान देणगीबद्दल संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्स, पुणे रिजनच्या सर्व डीलर्सचा सत्कार केला. यावेळी टाटा मोटर्सचे प्रतिनिधी आणि संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.

शिर्डी साईबाबा संस्थानला विविध नामांकित वाहन कंपन्यांकडून नेहमीच दुचाकी आणि चारचाकी वाहने दान स्वरूपात दिली जातात. आतापर्यंत महिंद्रा आणि टीव्हीएस या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वाहने दानात मिळाली आहेत. आता टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील डीलर्सनी एकत्रित येत ही मोठी देणगी दिल्याने संस्थानच्या ताफ्यात एका प्रीमियम कारची भर पडली आहे.

Web Title : टाटा मोटर्स ने शिरडी साईं को 25.69 लाख की लग्जरी कार दान की

Web Summary : टाटा मोटर्स, पुणे के डीलरों ने गणेश जयंती पर शिरडी साईं मंदिर को ₹25.69 लाख की टाटा सिएरा भेंट की। कार की विधिवत पूजा की गई और साईं बाबा संस्थान को सौंप दी गई, जिससे उनके वाहन बेड़े में वृद्धि हुई। यह महिंद्रा और टीवीएस से पहले किए गए दान के अतिरिक्त है।

Web Title : Tata Motors Donates Luxurious Car Worth ₹25.69 Lakhs to Shirdi Sai

Web Summary : Tata Motors, Pune dealers, gifted a ₹25.69 lakh Tata Sierra to Shirdi Sai Temple on Ganesh Jayanti. The car was ceremoniously worshipped and handed over to the Sai Baba Sansthan, enhancing their vehicle fleet. This adds to previous donations from Mahindra and TVS.