शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अर्भक मृत्यूप्रकरणी कठोर कारवाई करा

By admin | Updated: March 16, 2015 02:50 IST

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयातून परत पाठवून दिलेल्या गरोदर महिलेच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी रु ग्णालयातील सर्व

ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयातून परत पाठवून दिलेल्या गरोदर महिलेच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी रु ग्णालयातील सर्व संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले आहेत. तसेच याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी प्रभारी पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना दिले.जालन्याहून आलेल्या शारदा घोडे यांना वैद्यकीय तपासणीसाठी लागणारे ८०० रु पये नसल्यामुळे रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर रस्त्यावरच त्यांची प्रसूती झाली. मात्र बाळाला वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री शिंदे यांनी सध्या विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शारदा व त्यांचे पती गंगाराम घोडे यांची रविवारी भेट घेऊन विचारपूस केली. तसेच, या प्रकरणी जबाबदार असलेल्यांची गय न करता कठोर कारवाईचे आदेश आयुक्त जयस्वाल यांना दिले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी प्रभारी पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना दिले. दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.