शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

आवक मंदावल्याने गोड फळे झाली कडू

By admin | Updated: June 20, 2014 22:11 IST

पावसाला सुरूवात झाली असली तरी गेल्या महिनाभरात वाढलेल्या तापमानामुळे बाजारपेठेत फळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

राजेंद्र वाघ, शहाड - पावसाला सुरूवात झाली असली तरी गेल्या महिनाभरात वाढलेल्या तापमानामुळे बाजारपेठेत फळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे सध्या फळबाजार कडाडला असून फळांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वमसाान्यांसाठी गोड असणारी फळे आता कडू वाटू लागली आहेत.उन्हाळ्यात हिमाचल प्रदेश, सिमला आदी ठिकाणाहून सफरचंद येत नाहीत. त्यामुळे सध्या तरी साठवलेला माल बाजारात विक्रीसाठी येत आहे. बाहेरील देशांमधून आयात केलेली सफरचंद तब्बल २०० रुपये किलो इतका दर आहे. हिमाचल प्रदेशातील सफरचंद १५० रुपये किला दराने मिळत आहेत. डाळींब १४० रुपये, पेर १६० रुपये व संत्रा १०० रुपये किलो दराने विकली जात आहेत. शिवाय स्ट्रॉबेरी, मोसंबी व खरबूज ही फळेदेखील बाजारात उपलब्ध असली तरी ते सुद्धा ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जात आहेत.सर्वच फळांच्या किंमती शंभर रुपयांच्या आसपास गेल्याने सर्वसामान्यांना फळांचा गोडवा चाखणे कठीण झाले आहे. याशिवाय फळबाजारावर अवलंबून असलेले विविध प्रक्रिया उद्योगांवरही या दरवाढीचा परिणाम झाला आहे. व्यापारी व किरकोळ विक्रेते सुद्धा बाजारातील तेजी-मंदी अर्थात परिस्थिती पाहून माल उचलतात. सध्या बाजारात मागणी जास्त असली तरी फळांची आवक कमी असल्याने फळांचे दर गगणानाल भिडले आहेत. ज्युस मिळणे झाले कठीणफळांचे दर गगनाला भिडल्याने त्याचा परिणाम ज्यूस विक्रीवर झाला आहे. सध्या कल्याण , डोंबिवली व आसपासच्या परिसरात ३० ते ३५ रुपये प्रतिग्लास ज्यूस बाजारात मिळत आहे. ज्युसचे दर वाढल्याने ज्यूस पिण्याकडे असलेला नागरिकांचा कल कमी झाला आहे. असे आहेत दर२०० रूपये - सफरचंद२०० रुपये - जरदाळू१६० रुपये - पेर१४० रुपये - डाळींब१०० रुपये -संत्रा५० रुपये - खरबूज६० रुपये - मोसंबी६० रुपये - स्ट्रॉबेरी६० रुपये - आंबा४० रुपये - केळी (डझन)वरील दर प्रति एका किलोचे'सध्या वातावरण अत्यंत प्रतिकूल असल्याने बाजारात फळाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे फळांचे दरही वाढले आहेत. परंतु आता पावसाला सुरूवात झाली असून येत्या महिनाभरात फळांची आवक वाढून दर सुद्धा कमी होती'- विनोद मौर्या, फळविक्रेता, कल्याण