शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन पोलिसांना केले निलंबित

By admin | Updated: August 22, 2015 00:58 IST

छेडछाड करणाऱ्या तरुणाला पाठिशी घालत पोलिसांनी प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्याने तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी शहरात संतप्त प्रतिक्रिया

औरंगाबाद : छेडछाड करणाऱ्या तरुणाला पाठिशी घालत पोलिसांनी प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्याने तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी दोन पोलिसांनी तडकाफडकी निलंबित केले. तर सहायक फौजदाराची उचलबांगडी केली.श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणामुळे शहरात पोलिसांविरुद्धच जनक्षोभ उसळला आहे. आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सिडको ठाण्यातील सहायक फौजदार राजू वैष्णव व जमादार एन.डी. हिवाळे यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले. तर सहायक फौजदार हरीष खटावकर यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली.आरोपी स्वप्नील मिणियार (२४, रा. तुर्काबाद खराडी, ता. गंगापूर) याच्याकडून सतत येणाऱ्या अश्लील एसएमएस, फोन आणि धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या श्रुतीने १७ आॅगस्टला विषारी गोळ्या सेवन केल्या होत्या. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २० आॅगस्टला तिचे निधन झाले. विशेष म्हणजे याप्रकरणी केवळ विनयभंगासारखा किरकोळ स्वरुपाचा गुन्हा दाखल करून सिडको पोलिसांनी आरोपीला पाठीशी घातले होते. एवढेच नव्हे तर २४ जुलैला त्याच्याविरोधात छेडछाड आणि अश्लील एसएमएस पाठविणे आणि धमकावण्याची तक्रार श्रुतीने पोलिसांकडे नोंदविली. मात्र तब्बल दहा दिवसांनी पोलिसांनी त्यास अटक केली. न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले. त्याच वेळी आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर पहिल्या तक्रारीनंतर तिला धमकावण्याची आरोपीची हिंमत झाली नसती आणि ती आज जिवंत असती, असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. श्रुतीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी स्वप्नीलवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम लावले आहे. अद्यापही तो पोलिसांना सापडलेला नाही. शुक्रवारी श्रुतीची बहीण श्रद्धा अमितेश कुमार यांना भेटली. सिडको पोलिसांनी केलेल्या दिरंगाईचा तिने पाढाच वाचला. श्रुतीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ४ वाजेपर्यंत पोलीस तिचा जबाब नोंदविण्यासाठी आले नव्हते. धावाधाव केल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस रुग्णालयात आले, असे तिने सांगितले. सहायक फौजदार हरीश खटावकर यांनी माझ्याशी अश्लील शब्द वापरले, त्यांनी आपल्याला उद्धट वागणूक दिली, अशा आशयाची तक्रार श्रद्धाने अमितेशकुमार यांच्याकडे केली. आरोपी मिणियारच्या वकिलाने त्याच्या सांगण्यावरून आणि पोलिसांच्या सहकार्याने रुग्णालयात जाऊन श्रुतीची भेट घेतली होती. विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी हिवाळे हे त्यास घेऊन रुग्णालयातील आयसीयूमध्ये आले होते. (प्रतिनिधी)