शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

२४ हजार ७२३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 2:31 AM

पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक रकमेची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला सादर होणार असताना वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तब्बल २४ हजार ७२३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यामुळे बजेटपूर्वी सरकारने मिनीबजेटच मांडल्याचे दिसते.नगरविकास विभागासाठी ३४२ कोटी, गृहनिर्माण विभागासाठी १६५२ कोटी, पाणी पुरवठा विभागासाठी ४४२ कोटी रूपये अशा महत्त्वाच्या तरतुदीदेखील आहेत.सातारा, सांगली, कोल्हापूरात आलेल्या पूरामुळे नुकसान भरपाई आणि नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ५ हजार ३७९ कोटी रूपयांची तरतूद आहे. शासकिय इमारतींची दुरूस्ती- नव्याने बांधणी, रेल्वे उड्डाणपूल, पादचारी रस्ते, रस्ते विस्तारीकरण, शहरी रस्ते बांधकाम आदीसाठी तब्बल २ हजार कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहेत.कर्जमाफीसाठी १५ हजार कोटीया पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक रकमेची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यासाठी करण्यात आली आहे. ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा देण्यासाठी २ हजार कोटी रुपये यासाठी यापूर्वीच काढून ठेवण्यात आले होते. यात भर घालण्यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीतून १ हजार कोटी रु. काढून ती रक्कम यात जमा करण्यात आली. तर १२ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून एकूण १५ हजार कोटी रुपये यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.राष्ट्रीय जनगणनेच्या कामासाठी २६ कोटी शेतकऱ्यांच्या पिकाचे विमा हप्ते भरण्यासाठी १५० कोटी, शिवभोजन योजनेसाठी ६ कोटी ३८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुंबईसाठी १०० कोटीपर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई पर्यटन प्रकल्पाला १०० कोटी रूपयांचा निधीही या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा