१७ जानेवारीच्या 'त्या' व्हिडिओवर सुनील तटकरेंचा दावा; NCP विलीनीकरणाच्या बैठकीवर काय बोलले?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 16:12 IST2026-01-31T16:11:38+5:302026-01-31T16:12:15+5:30

१७ जानेवारीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह काही नेत्यांचा बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Sunil Tatkare claim on Ajit Pawar-Sharad Pawar video of January 17; What did he say on the NCP merger meeting? | १७ जानेवारीच्या 'त्या' व्हिडिओवर सुनील तटकरेंचा दावा; NCP विलीनीकरणाच्या बैठकीवर काय बोलले?  

१७ जानेवारीच्या 'त्या' व्हिडिओवर सुनील तटकरेंचा दावा; NCP विलीनीकरणाच्या बैठकीवर काय बोलले?  

मुंबई - अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवेगळ्या चर्चा पुढे येत आहे. खुद्द शरद पवारांनीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. या चर्चेला अंतिम स्वरुप आले होते. १२ फेब्रुवारीला याची घोषणाही होणार होती असा खुलासा केला. मात्र अजित पवारांच्या अपघाताने यात खंड पडला आहे असं ते म्हणाले. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया यावर उमटत आहेत. त्यातच १७ जानेवारीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह काही नेत्यांचा बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला. त्याने या नेत्यांमधील बैठकीला पुष्टी मिळाली. आता या व्हिडिओवर सुनील तटकरेंनी भलताच दावा केला आहे. 

Video: गोविंदबागेतील 'तो' व्हिडिओ समोर; मृत्यूच्या १० दिवसांपूर्वीच शरद पवारांसोबत अजितदादांची चर्चा

या व्हिडिओवर सुनील तटकरे म्हणाले की, मी एक व्हिडिओ पाहिला. त्यात नेते दिसत आहेत. हा व्हिडिओ बारामती येथील कृषी प्रदर्शनावेळीचा आहे. त्याचवेळी चहापानासाठी बैठक झाली होती. यानंतर स्वत: अजित पवारांनी बैठक घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतायेत त्याबाबत चर्चा झाली असा स्पष्ट खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी दिली होती. त्यादिवशी जी चर्चा झाली ती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. याबाबत सविस्तर आपल्याशी बोलतो असं तटकरेंनी सांगितले.

तर विलीनीकरणामागे २ कारणे होती. पहिले कारण म्हणजे अजितदादा भावनिक होते. शरद पवारांसोबत त्यांचे नाते खूप हळवे होते. शरद पवारांच्या डोळ्यादेखत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायची अशी भावना अजितदादांनी व्यक्त केली होती. त्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी विभागल्यामुळे मतांच्या विभाजनाचा तोटा पाहून एकत्र ताकद वाढवायची याबाबत दोन्ही बाजूने सकारात्मक होते. मात्र आता अजितदादा नाहीत. ते असते तर त्यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला असता. काय काय करायचे हे ठरले होते. आता त्या बैठकीतला व्हिडिओ आला आहे. त्यात अजितदादांसोबत चर्चा झाली की नाही याचे सत्य समोर आले आहे असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला.

काय म्हणाले होते अजित पवार?

शरद पवारांच्या गोविंदबाग येथे दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रितपणे लढवण्यावर सखोल चर्चा झाली. तेव्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत अजित पवारांनी सावध भूमिका घेतली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत सध्या आम्ही महायुतीत आहोत. पुढील निर्णय स्थानिक पातळीवर भौगोलिक परिस्थिती, राजकीय समीकरणे आणि पक्षांची ताकद पाहून योग्य वेळी घेतला जाईल असं विधान अजितदादांनी केले होते तर याच बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाबाबत चर्चा सुरू आहे. बघूया काय होतंय ते..बंद  दाराआड केलेली चर्चा बाहेर येते का असा प्रतिसवाल करत अधिक भाष्य करणे टाळले. 

Web Title : अजित पवार की मृत्यु से पहले एनसीपी विलय वीडियो पर सुनील तटकरे का दावा।

Web Summary : सुनील तटकरे का दावा है कि एनसीपी नेताओं का एक वीडियो एक कृषि प्रदर्शनी के दौरान चाय की बैठक का है। विलय की बातचीत अजित पवार के शरद पवार के साथ भावनात्मक संबंध और राजनीतिक ताकत को मजबूत करने के लिए हुई थी, लेकिन अब अजित नहीं रहे।

Web Title : Sunil Tatkare claims about NCP merger video before Ajit Pawar's death.

Web Summary : Sunil Tatkare claims a video of NCP leaders is from a tea meeting during an agriculture exhibition. Merger talks were driven by Ajit Pawar's emotional connection with Sharad Pawar and to consolidate political strength, but now Ajit is no more.