शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रविवार गारठला

By admin | Updated: October 27, 2014 00:35 IST

साधारणत: दिवाळीच्या सुमारास उपराजधानीत गुलाबी थंडी पडायला सुरुवात होते. परंतु अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे वातावरणात प्रचंड बदल झाला असून सलग दुसऱ्या दिवशी बोचरी थंडी अनुभवायला मिळाली.

उपराजधानीत थंडीची चाहूल : स्वेटर्स, मफलर्स निघाले बाहेरनागपूर : साधारणत: दिवाळीच्या सुमारास उपराजधानीत गुलाबी थंडी पडायला सुरुवात होते. परंतु अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे वातावरणात प्रचंड बदल झाला असून सलग दुसऱ्या दिवशी बोचरी थंडी अनुभवायला मिळाली. ‘आॅक्टोबर हिट’चा सामना करणारे नागरिक रविवारी दुपारी चक्क स्वेटर्स घालून फिरताना दिसून आले. हिवाळ््याची चाहूल लागली असली तरी अरबी समुद्रातील घडामोडींमुळे तापमानात ६ अंशांहून अधिक घसरण दिसून आल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.दिवाळीच्या अगोदर नागपुरात दिवसा ‘आॅक्टोबर हिट’ जाणवत होते. पण अरबी समुद्रातील वादळाने वातावरणच बदलवले. शनिवारप्रमाणे रविवारीदेखील दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास काही भागात पावसाचा शिडकावा पडल्याने थंडी आणखी जाणवून येत होती. रविवारी उपराजधानीत कमाल २६.६ अंश सेल्सिअस तर किमान १८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. कमाल तापमानात सरासरीहून चक्क ६ अंशांनी घसरण झाली आहे. पुढील दोन दिवस अशाच प्रकारचे वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)‘कूल संडे’चा माहौलउपराजधानीत सगळीकडेच दिवाळीची रौनक असताना थंडगार वातावरण झाल्यामुळे नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. अनेकांनी निरनिराळ््या पिकनिक स्पॉटकडे धाव घेतली तर काहींनी घरी आलेल्या पाहुण्यांना घेऊन फुटाळा, ट्रॅफीक पार्क यासारखी ठिकाणे पालथी घातली. सायंकाळच्या सुमारास पावसाचा शिडकावा आल्याने घराबाहेर पडलेल्यांची काही वेळ तारांबळ उडाली. विशेषत: तरुणाई अन् बच्चे कंपनीने ‘कूल संडे’चा मनमुराद आनंद लुटला. आतापर्यंत बाहेर न निघालेले स्वेटर, जॅकेट थंडी अन् पावसाच्या निमित्ताने अनेक जण अंगात घालून फिरताना दिसून आले.