शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठ उजळणार सूर्यप्रकाशाने

By admin | Updated: June 4, 2014 22:21 IST

पुणे विद्यापीठाने आपल्या विविध प्रशासकीय इमारतींमध्ये पारंपरिक उर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली वीज वापरली जावी,

सौर उर्जाचा वापर : लाखो रुपयांची होणार बचतपुणे : पुणे विद्यापीठाने आपल्या विविध प्रशासकीय इमारतींमध्ये पारंपरिक उर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली वीज वापरली जावी, या दिशेने पाऊल टाकण्यास विद्यापीठाने सुरूवात केली असून सौर उर्जा निर्मिती करणार्‍या एस. स्ट्रॉनिक कंपनीशी करारही केला आहे. परिणामी लवकरच विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीवर सौर उर्जा निर्मिती करणारी उपकरणे बसविली जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या इमारती एमएससीबीच्या प्रकाशाने नाही तर सूर्यप्रकाशाने उजळून निघणार आहेत.विद्यापीठाला दर महिन्याला एमएससीबीचे एक कोटी रुपये वीज बील भरावे लागले. परिणामी विद्यापीठाला वीज बिलासाठी एका वर्षाला १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. मात्र, विद्यापीठाने एस.स्ट्रॉनिक कंपनीशी करार केल्यामुळे पुढील काळात विद्यापीठाची वीज बिलाची रक्कम कमी होणार आहे.विद्यापीठात उभारल्या जाणार्‍या सौर उर्जा लघु प्रकल्पाची माहिती देताना कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, विद्यापीठाच्या बीसीयूडी, व प्रशासकीय इमारतीवर उभारल्या जाणार्‍या सौर उर्जा प्रकल्पाचा सर्व खर्च एस. स्टॉनिक कंपनी करणार आहे. विद्यापीठाने या कंपनीशी २० वर्षांचा करार केला आहे. विद्यापीठ सध्या ज्या दराने वीज बिलाचा भरणा करत आहे. त्यापेक्षा केवळ एक रुपये अधिक रक्कम या कंपनीकडून वापरल्या जाणार्‍या विजेच्या मोबदल्यात विद्यापीठातर्फे पुढील पाच वर्षे दिली जाणार आहे. एमएससीबीचे विजेचे दर वाढले तरी पुढील पाच वर्षे एस. स्टॉनिक कंपनीतर्फे विजेचे दर वाढविले जाणार नाहीत. त्यामुळे विद्यापीठाचा वीजेचा खर्च कमी होणार आहे.पुणे विद्यापीठ व थरमॉक्स कंपनीतर्फे केंद्र शासनाला एक प्रस्ताव सादर केला जाणार असून त्या अंतर्गत ५० ते ६० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून तळेगाव जवळील शिवे या लहानशा खेडे गावात कचरा व सौर उर्जा या दोन्ही पासून उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प उभा केला जाणार आहे. तसेच प्रकल्पातून तयार होणारी वीज या गावाला उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.