शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उदयोजकाची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: July 21, 2016 18:40 IST

एका उद्योजकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेपूर्वी रामानंदनगर रिक्षा स्टॉप परिसरात घडली. व्यावसायिकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

रामानंदनगरातील घटना : नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशयजळगाव : एका उद्योजकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेपूर्वी रामानंदनगर रिक्षा स्टॉप परिसरात घडली. व्यावसायिकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भूपेंद्र दत्तात्रय पाटील (वय ४०, रा.रामानंदनगर, जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या उद्योजकाचे नाव आहे. रामानंदननगर रिक्षा स्टॉप परिसरात दत्त मंदिराजवळ प्लॉट क्रमांक २० मध्ये भूपेंद्र पाटील यांचे दुमजली घर आहे. घराच्या वरच्या मजल्यावर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना घडली तेव्हा; त्यांची पत्नी, आई-वडील व तीन मुले खालच्या मजल्यावर होते. भूपेंद्र पाटील यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. घटना उघडकीस आल्यानंतर पाटील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.प्लास्टिक पाइप निर्मितीचा उद्योगसुसरी, ता.भुसावळ हे भूपेंद्र पाटील यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील दत्तात्रय पाटील हे वनविभागात नोकरीला होते. त्यामुळे ते गेल्या अनेक वर्षांपासून जळगावात स्थायिक झालेले आहेत. काही दिवसांपूर्वीच दत्तात्रय पाटील हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे ते रामानंदनगरात मुलाकडे राहत होते. भूपेंद्र पाटील हे एकटे होते. त्यांना दोन विवाहित बहिणी असून एक बहीण नाशिकला तर दुसरी पुण्याला राहते. पाटील हे उद्योजक होते. त्यांच्या एमआयडीसीत ‘बी सेक्टर’मध्ये (प्लॉट क्रमांक ३२) समृद्धी अ‍ॅग्रो प्लास्ट नावाच्या दोन कंपन्या आहेत.नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशयभूपेंद्र पाटील यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. कंपन्यामुळे त्यांच्यावर आर्थिक देणे वाढले होते. त्यामुळेच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला असावा, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, समृद्धी (१३) व अर्पिता (२) या दोन मुली, ऐश्वर्य (१०) व आई-वडील असा परिवार आहे.