शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत कायद्यात सुधारणा सुचवू

By admin | Updated: January 30, 2015 05:17 IST

विद्युत अधिनियम २००३मध्ये सुधारणा करण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केलेले आहे. याबाबत ग्राहकहित डोळ्यांसमोर ठेवून लवकरात

मुंबई : विद्युत अधिनियम २००३मध्ये सुधारणा करण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केलेले आहे. याबाबत ग्राहकहित डोळ्यांसमोर ठेवून लवकरात लवकर राज्य शासनाकडून सूचना पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.विद्युत अधिनियम २००३मधील सुधारणांबाबत राज्याची भूमिका समजावून घेण्यासाठी खासदार किरीट सोमय्या यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली; त्या वेळी बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. विद्युत सुधारणा बिल २०१४च्या अनुषंगाने अभ्यास करून संसदेला अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोमय्या यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबत सविस्तर अभ्यास करून किमान वेळेत राज्याची भूमिका केंद्राकडे स्पष्ट केली जावी, असेही निर्देश बावनकुळे यांनी बैठकीदरम्यान प्रधान सचिव ऊर्जा आणि तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले.याप्रसंगी ऊर्जा सचिव मुकेश खुल्लर, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी आणि महापारेषणचे संचालक राजीव कुमार मित्तल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.दरम्यान, बावनकुळे यांनी या वेळी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावाही घेतला आणि कालबद्ध मुदतीत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)