शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सुखप्राप्तीसाठी आईचा बळी!

By admin | Updated: December 30, 2014 01:23 IST

एका महिला मांत्रिकाच्या सल्ल्यावरून अंधश्रद्धेतून स्वत:च्या जन्मदात्या आईचाच बळी देण्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिकाने आणखी एका महिलेचाही बळी दिला आहे.

महिला मांत्रिक फरार : ठाणे जिल्ह्यातील दोघे भाऊ ताब्यातघोटी (नाशिक) : ठाणे जिल्ह्यातील काशिनाथ व गोविंद दोरे यांनी सुख लाभत नसल्याच्या कारणावरून नाशिक जिल्ह्यातील टाके हर्ष येथील एका महिला मांत्रिकाच्या सल्ल्यावरून अंधश्रद्धेतून स्वत:च्या जन्मदात्या आईचाच बळी देण्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिकाने आणखी एका महिलेचाही बळी दिला आहे.घोटी पोलिसांनी याप्रकरणी दोरे बंधू व त्यांना मांत्रिकाकडे घेऊन जाणाऱ्या त्यांच्या बहिणीला ताब्यात घेतले आहे. महिला मांत्रिक फरार झाली आहे. तिचे नाव कळू शकलेले नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष गावाजवळ एका महिला मांत्रिकाने एका महिलेचा बळी दिल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांना मिळाल्यानंतर त्यांनी घोटी पोलिसांना कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी चौकशी केल्यानंतर मंदिर बांधणीच्या नावाखाली महिला मांत्रिकाला सात बळी द्यायचे होते. तिने दोन महिलांचा बळी दिला असून एका महिलेने तिच्या तावडीतून सुटका केल्याने ती बचावल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दांडवळ येथील काशिनाथ आणि गोविंद दोरे यांची बहीण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथे राहते. आपल्याला सुख मिळत नसल्याचे त्यांनी बहिणीला सांगितले. तिने गावातील एका महिला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी महिला मांत्रिकासमोर व्यथा मांडल्यानंतर तिने तुझी आई आणि बहीण चेटकीण असल्याने तुम्हाला सुख लाभत नसून दोघींचा बळी द्यावा लागेल, असे सांगितले. काशिनाथ आणि गोविंद यांनी दिवाळीत त्यांची आई बुधीबाई पुना दोरे आणि बहीण राहीबाई पिंगळे यांना तिच्याकडे आणले. तिने दोघींना बेदम मारहाण केली व बुधीबाई हिचे डोळे काढले. त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र राहीबाई पिंगळे हिने प्रसंगावधान राखत पळ काढला. मात्र महिला मांत्रिकाने बुगीबाई वीर हिचा बळी दिल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले. (वार्ताहर)पोलिसांनी सोमवारी राहीबाईला ताब्यात घेतले. तिने घटनेची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी काशिनाथ व गोविंद दोरे यांना ताब्यात घेतले. पोलीस बुधाबाई यांचा पुरलेला मृतदेह मंगळवारी काढणार आहेत.