शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सुब्बा, सिंग, बिनीवाले, गोलंदाज यांनी लावला झेंडा

By admin | Updated: February 23, 2015 00:16 IST

‘रग्गेडियन आॅब्स्टॅकल रेस’ : देशविदेशातील साडेतीनशेहून अधिक जणांचा सहभाग; ‘टाइमचिप’चा प्रथमच वापर

कोल्हापूर : लष्करी प्रशिक्षणाप्रमाणेच खडतर १५ किलोमीटर पल्ल्याच्या ‘रग्गेडियन आॅब्स्टॅकल रेस’ या स्पर्धेत धावणे, चिखलातून व तारेखालून जाणे, दोरीच्या साहाय्याने चढाई करणे अशा दऱ्याखोऱ्यांतील आव्हानात्मक रेसमध्ये खुल्या गटात अमर सुब्बा याने, तर महिला गटात शिल्पा सिंग व शालेय गटात अ‍ॅलन गोलंदाज यांनी बाजी मारली.कोल्हापुरातील ‘कासा’ या संस्थेच्यावतीने सादळे-मादळे येथील डोंगरात झालेल्या या अडथळ्यांच्या स्पर्धेत कोल्हापूरसह देश-विदेशातील साडेतीनशेहून स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेचा थरार अनुभवला. स्पर्धेची सुरुवात सादळे येथील खास तयार केलेल्या सेंटर पॉइंटपासून झाली. प्रथमच अशा पद्धतीचा थरार अनुभवण्यासाठी स्पर्धकांना उत्सुकता होती. या स्पर्धेत एकूण १५ किलोमीटर अंतर स्पर्धकांना पार करावयाचे होते. त्यात धावण्यासह चिखलातून जाणे, याचबरोबर तारेखालून जाणे, दोरीच्या साहाय्याने चढाई करणे, जाळी व टायरच्या अडथळ्यांतून जाणे, १५ किलोंचे पोते उचलून धावणे, आगीवरून उडी मारून जाणे, अशा अनेक विविध आव्हानांना सामोरे जात स्पर्धा पूर्ण करावयाची होती. या स्पर्धेत विविध वयोगट, खुला गट आणि महिलांचा गट तसेच फन गट अशा प्रकारांत ही स्पर्धा घेतली. स्पर्धेत प्रथम सुरुवात झाल्यानंतर हलकीशी थंडी असल्याने स्पर्धकांचा उत्साह दुणावला होता. मात्र, जसजसे ऊन वाढू लागले, तसे स्पर्धकांची चांगलीच दमछाक झाली. स्पर्धा संपूर्णपणे सादळे-मादळेच्या डोंगरदऱ्यांतून झाल्याने प्रथम बघणाऱ्या रसिकांना खाली पाहिले तर धडकीच भरावी, असे चित्र दिसत होते; पण स्पर्धकांनी अशा आव्हानांना तोेंड देत स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापूरकरांनी अशा प्रकारचा थरार प्रथमच अनुभवला. स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : खुला गट - वयोगट ४५ वरील - अमर सुब्बा (सिक्कीम), उदय महाजन, विश्वास चौगुले.महिला - खुला गट (३६ ते ४५ वय)- शिल्पा सिंग, सुचेता काटे, पल्लवी पिसाळ (दोघींना विभागून द्वितीय), अर्चना देशपांडे.महिला (४५ वयोगटावरील) - अवंती बिनीवाले, अंजली जाधव.शालेय गट मुले - अ‍ॅलन गोलंदाज, अभिषेक देवकाते, योगेश आडके. मुली - कस्तुरी गोरे, केतकी गोरे, कस्तुरी सावेकर.१६ ते २५ मुले गट - संतोष पाटील, सुनील कोरी, करण गायकवाडमहिलांमध्ये - इंदरजा बेनाडीकर, मृदुल शिंदे, सोनिया यादव.मुले - २६ ते ३५ वयोगट - चैतन्य वेल्हाळ, विशाल शिलीमकर, मायकेल लेहिंग (जर्मनी). खुला गट - ३६ ते ४५ वयोगट - मुले - संदीप काटे, बाळासाहेब पाटील, दिनेशसिंग.फन गट मुले - किरण पाटील, गौरव जोशी, विनायक कुंभार. मुलींमध्ये - रुची मुक्ती, रुची ओसवाल, अंकिता आमटे. स्पर्धेचे उद्घाटन अक्कलकोटचे तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या हस्ते झाले. यावेळी अमोल कोरगावकर, आशिष कोरगावकर, रवींद्र प्रभू, राहुल गायकवाड, नगरसेवक सत्यजित कदम, कर्नल पी. सी. पवार, आदी उपस्थित होते. स्पर्धा संयोजनात ‘व्हाईट आर्मी’च्या २० जवानांनी स्पर्धकांना मार्ग दाखविणे, जखमींवर औषधोपचार करणे, आदी कामे करून मदत केली; तर टी. ए. बटालियनचे कर्नल पी. सी. पवार, सुभेदार मेजर नरेश चंद्र, सुभेदार तारादत्त, हवालदार उदय वीर यांनी संयोजकांना मार्गदर्शन केले.या सेलिब्रिटींनीही केली स्पर्धा पूर्णजर्मनीतील ‘आयर्न मॅन’ मायकेल लेहिंग, हिमालयात ४४० किलोमीटर धावण्याचा विश्वविक्रम करणारा सिक्कीमचा अमर सुब्बा व दार्जिलिंगचा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू रोशन जी., नृत्यचंद्रिका संयोगीता पाटील, आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला कार ड्रायव्हर चित्तेश मंडोडी यांनी स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. याशिवाय सातारच्या अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांची बायपास सर्जरी झाली आहे. त्यांच्यासह ४० वर्षांवरील पाच महिलांनीही स्पर्धा पूर्ण करत हम किसीसे कम नही हे दाखवून दिले.टाइमचिपचा प्रथमच वापरस्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाच्या टी शर्टवर संयोजकांच्यावतीने टाइमचिप लावली होती. स्पर्धा सुरू झाल्यानंतर या चीपमुळे त्या स्पर्धकाने स्पर्धा किती वेळात पूर्ण केली याची माहिती संयोजकांना कळण्यास मदत झाली. ंं‘हेलिकॅम’चा वापरस्पर्धेचा मार्ग दऱ्याखोऱ्यांतील अडथळ्यांचा व आव्हानात्मक असल्याने संयोजकांनी स्पर्धकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, याकरिता हेलिकॅम कॅमेऱ्याचा वापर करीत स्पर्धेवर नियंत्रण ठेवले. अशी स्पर्धा दरवर्षी व्हावीअशा पद्धतीचा रग्गेड अनुभव देणारी आव्हानात्मक स्पर्धा कोल्हापूरसारख्या ठिकाणी संयोजकांनी भरवून कोल्हापूरकरांसह देशातील दिग्गजांना वेगळा अनुभव दिला. त्यामुळे अशी स्पर्धा दरवर्षी भरवावी. - चित्तेश मंडोडीआंतरराष्ट्रीय फॉर्म्युला कार ड्रायव्हरआतापर्यंत १२ तास सलग धावण्याची स्पर्धा यशस्वीरीत्या पार केली. मात्र, अशा प्रकारची वेगळी व साहसी अनुभव देणारी स्पर्धा आपण प्रथमच अनुभवतो आहोत. हा अनुभव मनाला चांगला वाटला. यापुढील स्पर्धेत आमची संपूूर्ण टीम सहभागी होईल.- रोशन. जीआंतरराष्ट्रीय धावपटू (दार्जिलिंग)