शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीसाठी गेलेला विद्यार्थी सुमद्रात बेपत्ता

By admin | Updated: February 14, 2016 00:26 IST

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेलेला संकेत खानविलकर हा १४ वर्षांचा विद्यार्थी मांडवी किनाऱ्यावर समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३०च्या

रत्नागिरी : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेलेला संकेत खानविलकर हा १४ वर्षांचा विद्यार्थी मांडवी किनाऱ्यावर समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३०च्या सुमारास घडली. संकेत खानविलकर हा रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये नववीमध्ये शिकत होता. शनिवारी दुपारी १ ते २ या वेळेत नववीचा घटक चाचणी परीक्षेचा भूगोलचा शेवटचा पेपर देऊन तो आपल्या मित्रांसह शाळेतून बाहेर पडला. त्याचा वर्गमित्र दीपक सुरेश झोरे याचा शुक्रवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त पार्टी करण्याचे मित्रांनी ठरविले. त्याप्रमाणे संकेतबरोबर त्याचे सर्व मित्र निखिल विनय कांबळे, दीपक झोरे, हृषीकेश राजेश शेलार आणि अक्षय कृष्णा वरक हे आठवडा बाजारातील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे पार्टीनिमित्त त्या पाचही जणांनी भरपूर नाश्ता केला. यानंतर ते सर्व जण मांडवी किनाऱ्यावरील घुडेवठार येथे समुद्रकिनारी फिरायला गेले. तेथे बराच वेळ मौजमजा केल्यानंतर संकेत एकटाच समुद्रात पोहण्यासाठी उतरला. त्याच्याबरोबर अन्य दोन मित्रही पाण्यात गेले.संकेत पोहत असतानाच अचानक लाट आल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. त्या वेळी त्याच्या दोन मित्रांनी त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्नही केला. मात्र, ओहोटी असल्याने लाटेच्या पाण्याबरोबर तो खोल पाण्यात जाऊन बुडाला. संकेत हा आपल्या आजी-आजोबांकडे राहत होता. त्याची आई मुंबईत असते. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)