शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची २२२ आगारे तोट्यात

By admin | Updated: July 6, 2014 00:41 IST

एसटीच्या तिकिटांमध्ये भरमसाठ वाढ केली असली, तरी महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळावरील आर्थिक संकट कायमच आहे. महामंडाळाच्या २४९ पैकी २२२ आगारे आर्थिक तोट्यातून मार्गक्रमण करीत आहेत.

दररोज दोन कोटींचा फटका : परिवहन महामंडळ आर्थिक संकटातअकोला : एसटीच्या तिकिटांमध्ये भरमसाठ वाढ केली असली, तरी महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळावरील आर्थिक संकट कायमच आहे. महामंडाळाच्या २४९ पैकी २२२ आगारे आर्थिक तोट्यातून मार्गक्रमण करीत आहेत. त्यापैकी ५८ आगारे तर दहा वर्षांपासून सातत्याने तोट्यात असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत महामंडळाला दरदिवशी दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील विविध गावांना जोडण्याचे काम एसटीमुळेच शक्य झाले आहे. १९४८ साली सुरु झालेली एसटी आज खेड्यापाड्यात जाऊन पोहोचली आहे. एसटीकडून सध्या सर्वसाधारण, परिवर्तन, हिरकणी, एशियाड, शिवनेरी, अश्वमेध, शितल या विशेष गाड्या, तसेच सिटी बसही चालविण्यात येतात.आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी भाडेवाढीशिवाय एसटीकडे अन्य पर्याय नाही. गत आर्थिक वर्षात एसटीवर डिझेल दरवाढीमुळे ४८ कोटींचा, तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे १०० कोटींचा भार पडला. ही तूट भरुन काढण्यासाठी एसटीने १ जूनपासून २.४८ टक्के भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीतून १०० कोटींचे उत्पन्न महामंडळाला अपेक्षित असले, तरी ६८ कोटींची तूट कायमच राहणार आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीचे प्रवासी भाडे कमी असल्याने, महामंडळावर आर्थिक बोजा पडत असल्याचे मत महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. परिणामी, एसटीच्या आगारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत एसटीच्या २४९ पैकी २२२ आगारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. नाईलाज म्हणून काही आगार बंद करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचाराधीन असल्याचे सूत्रांनी सांगितले़ काही आगारे बीओटी तत्त्वावर चालविण्याची तयारीही केली असल्याचे समजते. (प्रतिनिधी)'