शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची हायटेक वारी, सर्व आगारांवर लागणार सोलार पॅनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 01:56 IST

एसटीने काही महिन्यांपूर्वी मुख्यालयात सोलार पॅनल लावले होते. यामुळे एसटीच्या विजेचा खर्च १० ते १२ टक्क्यांनी कमी झाला.

मुंबई : एसटी मुख्यालयाच्या धर्तीवर राज्यातील सर्व आगारांवर सोलार पॅनल लावण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. मंगळवारी एसटीच्या वाहन शोध व प्रवाशी माहिती प्रणालीचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.एसटीने काही महिन्यांपूर्वी मुख्यालयात सोलार पॅनल लावले होते. यामुळे एसटीच्या विजेचा खर्च १० ते १२ टक्क्यांनी कमी झाला. याच धर्तीवर एसटीच्या राज्यातील सर्व आगारांत सोलार पॅनल बसविण्यात येतील. यातून निर्माण होणारी अतिरिक्त वीज महावितरणला देण्याचा विचार आहे. यातून एसटीचा तोटा कमी करण्यास मदत होईल, असे रावते म्हणाले.याशिवाय परिवहन महामंडळाच्या सुमारे १८ हजार बसेससाठी वाहन शोध आणि प्रवासी माहिती प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी बोलताना रावते म्हणाले की, या प्रणालीमुळे एसटी नेमक्या कोणत्या मार्गे जाणार, यासह एसटीची नेमकी वेळ प्रवाशांना समजेल. या प्राणालीअंतर्गत बस स्थानकांवर एलसीडी टीव्हीवर गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची, सुटण्याची वेळ समजेल, एखादी एसटी उशिरा आल्यास तिची माहिती मिळेल. सध्या हा प्रकल्प मुंबई, पुणे आणि नाशिक या डेपोमध्ये सुरू केला असून, उर्वरित सहा महिन्यांत इतर सर्व भागांत ही प्रणाली सुरू करण्यात येईल. यासाठी पाच वर्षांसाठी ३२ कोटी ५५ हजार रुपयांचा करार केला आहे.प्रणालीमुळे एसटी चालकांच्या ओव्हर स्पीडिंगलादेखील आळा बसेल. एसटीने किती वेळेत प्रवास पूर्ण केला, चालकांनी मार्ग बदलला का, याची माहिती कंट्रोल रूमला त्वरित मिळेल. हे अ‍ॅप सहा महिन्यांत कार्यान्वित होईल. गुजरातनंतर महाराष्ट्र हे अशा प्रणालीचे अवलंब करणारे दुसरे राज्य असेल, असे रावते म्हणाले. दरम्यान, बेशिस्त एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनासंदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटी