शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लोको पायलटवर वाढला कामाचा ताण

By admin | Updated: June 23, 2014 01:12 IST

सहा महिन्यांसाठी भुसावळ डिव्हीजनला पाठविलेले लोको पायलट दोन वर्ष होऊनही परतले नाहीत. यामुळे नागपूर विभागात २५० लोको पायलटची पदे रिक्त झाली असून कार्यरत लोको पायलटवर कामाचा ताण वाढला आहे.

सुरक्षेशी तडजोड : अपघातांना निमंत्रण देतेय रेल्वे प्रशासनदयानंद पाईकराव - नागपूर सहा महिन्यांसाठी भुसावळ डिव्हीजनला पाठविलेले लोको पायलट दोन वर्ष होऊनही परतले नाहीत. यामुळे नागपूर विभागात २५० लोको पायलटची पदे रिक्त झाली असून कार्यरत लोको पायलटवर कामाचा ताण वाढला आहे. त्यांना सुट्या मिळणे बंद झाले असून, ओव्हरटाईम करावा लागत आहे. याचा परिणाम सुरक्षेवर होत असून बाहेर पाठविलेले लोको पायलट त्वरित परत बोलावून सुरक्षेशी करण्यात येत असलेली तडजोड बंद करावी, अशी मागणी होत आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १२७ लोको पायलट जून २०१२ मध्ये ६ महिन्यांच्या कालावधीसाठी भुसावळ विभागात पाठविण्यात आले. परंतु जून २०१४ पर्यंत हे लोको पायलट भुसावळ विभागाने नागपूर विभागाला परत केले नाहीत. सध्या नागपूर विभागात २५० लोको पायलटची पदे रिक्त झालेली आहेत. यामुळे कार्यरत असलेल्या लोको पायलटवर कामाचा ताण येत आहे. त्यांना सुट्या मिळणे बंद होऊन जास्त वेळ काम करण्याची पाळी आली आहे. लोको पायलटची नोकरी अतिशय जोखमीची आहे. सिग्नलकडे लक्ष ठेवून प्रवाशांना सुखरूप पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी लोको पायलटवर आहे. एखादा सिग्नल ओव्हर शूट झाल्यास त्यांना आपली नोकरी गमावण्याची पाळी येते. परंतु लोको पायलटची पदेच विभागात रिक्त असल्यामुळे त्यांना ओव्हरटाईम करण्याची पाळी आली असून यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विभागात गार्डची एकून ५६० मंजूर पदे असून त्यातील ११० पदे रिक्त आहेत. त्यामुळे गार्डला सुट्या मिळत नसून त्यांनाही लोको पायलटप्रमाणे ओव्हरटाईम करावा लागत आहे. त्यामुळे गार्डची आणि लोकोपायलटची रिक्त पदे त्वरित भरून सुरक्षेशी करण्यात येत असलेली तडजोड बंद करण्याची मागणी होत आहे.