शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे ‘उद्योग’ थांबवा !

By admin | Updated: January 18, 2015 02:08 IST

एरव्ही पर्यावरणप्रेमींच्या नावाने खडे फोडणाऱ्या शिवसेनेला अचानक पर्यावरण रक्षणाचा कळवळा आला आहे.

शिवसेना पर्यावरणवादी : मंत्री रामदास कदम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रयदु जोशी - मुंबईएरव्ही पर्यावरणप्रेमींच्या नावाने खडे फोडणाऱ्या शिवसेनेला अचानक पर्यावरण रक्षणाचा कळवळा आला आहे. शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खरमरीत पत्र लिहून केंद्र सरकारच्या उद्योगनीतीला तीव्र विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारने उद्योगांसाठी लागणारी पर्यावरणविषयक मंजुरीची अट शिथिल केली आहे. या निर्णयामुळे पर्यावरणाची ऐशीतैशी होईल, असा इशाराही मंत्री कदम यांनी दिला आहे. पर्यावरणविषयक मंजुरींबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांना कदम यांनी या पत्रात तीव्र विरोध दर्शविला आहे. ती लागू केल्याने उद्योगांवर पर्यावरण संतुलनाचे बंधन राहणार नाही, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस केंद्राने सर्व राज्यांना उद्योगांच्या पर्यावरणविषयक मंजुरींबाबतची नवीन मार्गदर्शक तत्त्वे पाठविली आहेत. त्यानुसार आतापर्यंत उद्योगांना वीज कनेक्शन हवे असेल, तर आधी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागत होते. मात्र आता तशी सक्ती राहणार नाही. ज्या राज्यांमध्ये अशी सक्ती आतापर्यंत होती त्यांनी याबाबत फेरविचार करावा म्हणजे उद्योगांना दिलासा मिळेल, असे केंद्राने सुचविले आहे. उद्योगांकडून केल्या जाणाऱ्या जल आणि वायू प्रदूषणावर प्रदूषण नियंत्रण मंडळाची नजर असते. पर्यावरण संतुलन बिघडविणाऱ्या उद्योगांवर मंडळ कारवाईदेखील करते. मात्र आता उद्योगांनी प्रदूषणाबाबत स्वयंप्रमाणित वा स्वयंनियमन करावे म्हणजे स्वत:चे पर्यावरणविषयक मूल्यांकन स्वत:च करावे, अशी पद्धत आणली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारित हा विषय येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. रामदास कदम यांनी या बदलांना तीव्र विरोध दर्शविताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्याचे अधिकार काढून घेतले तर उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली पर्यावरणाची अपरिमित हानी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

 

जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेना मुख्यत्वे पर्यावरणाच्या मुद्द्यावरूनच विरोध करीत आली आहे. कदम यांनी याबाबत अलीकडेच जाहीर भूमिका घेतली होती. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यामागे जैतापूर विरोध, हेच कारण असल्याची चर्चा आहे.