शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कदम ‘ईडी’च्याही रडारवर

By admin | Updated: September 27, 2015 05:32 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदम याच्याविरुद्ध सीआयडीने आधीच गुन्हे दाखल केले

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदम याच्याविरुद्ध सीआयडीने आधीच गुन्हे दाखल केले असताना आता ‘मनी लाँड्रिंग’च्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. महामंडळाचे तब्बल १४७ कोटी रुपये अन्यत्र वळविल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या महामंडळाचा २० महिने अध्यक्ष असताना त्याने महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेत केलेला भ्रष्टाचार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. महामंडळाची रक्कम त्याने आपल्या आणि सहकाऱ्यांच्या नावे असलेल्या कंपन्यांकडे वळती केली. या पैशांतून खरेदी केलेल्या संपत्तीवर ईडीकडून टाच येऊ शकते. चौकशीसाठी ईडीकडून कदमला लवकरच ताब्यात घेतले जाऊ शकते. -----रमेश कदमने असे केले गैरव्यवहार...आधी सीआयडी व आता ईडी कदम याच्यावरील ज्या गैरव्यवहारांच्या आरोपांची चौकशी करत आहे त्यातील काही ठळक गैरव्यवहार असे-ंस्वत: कदम अध्यक्ष असलेल्या बोरिवलीतील जोशाबा ग्राहक सहकारी संस्थेला ४१ कोटी रुपये महामंडळाकडून दिले.जोशाबा ग्राहक संस्थेला दिलेल्या ४१ कोटी रुपयांमधून १० कोटी रुपये हे संतोषी सिव्हील कंपनीला देण्यात आले. कुमराल कंपनीला ८ कोटी रुपये वाटले.५ कोटी रुपये कदमने स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यात टाकले.१ कोटी ३० लाख रुपये हे तिरुपती एंटरप्रायजेसला दिले.७२ लाख रुपये स्टर्लिंग मोटर्स या फर्मला देण्यात आले. ७१ लाख रुपयांत येवला-नाशिक मार्गावर कदमने जमीन खरेदी केली. कदम याने बोरिवली येथे २ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला.बीड बायपास; औरंगाबाद येथे ११.५० कोटींची जमीन खरेदी केली.----औरंगाबाद येथील नियोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सहकारी सुतगिरणीला ५८ कोटी ६५ लाख रुपयांची खिरापत वाटली.मैत्री शुगर या केवळ कागदावर असलेल्या कंपनीला विनायक साखर कारखाना खरेदी करण्यासाठी ३० कोटी रुपये दिले.मोहोळ तालुक्यातील महालक्ष्मी सहकारी दूध संघाला बनावट बँक खाते तयार करून ५ कोटी ३३ लाख रुपये देण्यात आले. रमेश कदमने पेडररोडला भूखंड खरेदी केला. त्यासाठी हब टाऊन कंपनीची उपकंपनी असलेल्या कुमराल रिअ‍ॅलिटी इस्टेट प्रा.लि.कंपनीच्या नावावर हा ८०० चौरस मीटरचा भूखंड होता. रमेश कदम आणि त्याचा पीए विजय कसबे यांनी या कंपनीचे १०० टक्के शेअर खरेदी केले. त्यासाठी महामंडळाकडून तब्बल ९६ कोटी रुपये हब टाऊन आणि कुमराल कंपनीकडे वळते करण्यात आले. औरंगाबाद येथे युपीएससी/एमपीएससी मार्गदर्शन केंद्राकरता जमिनीची खरेदी करण्यासाठी ११ कोटी ४० लाख रुपये महामंडळाकडून कोहली या व्यक्तीला देण्यात आले. प्रत्यक्षात २ एकर जमीन ही कदमच्या नावावर खरेदी करण्यात आली. मैत्री शुगरला दिलेल्या ३० कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपये हब टाऊन कंपनीकडे वळविण्यात आले. उर्वरित ५ कोटी रुपयांत कमलाकर ताकवाले आणि गाडेकर या आपल्या दोन सहकाऱ्यांच्या नावाने वळविण्यात आले. या शिवाय, महिला समृद्धी योजनेच्या नावाखाली १४८ कोटी रुपयांचे गैरव्यवहार करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)