शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भाजयुमोने जाळले 'स्वाभिमानी'च्या नेत्यांचे पुतळे

By admin | Updated: September 14, 2016 01:06 IST

चिखली येथील घटना; १0 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी स्वाभिमानीने ठिय्या आंदोलन केले.

चिखली (जि. बुलडाणा), दि. १३ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे पुतळे जाळल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नांदुरा तालुक्यातील शेतकर्‍यांना पीक विमा एकरी २८ रुपये मिळाल्याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या घटनेचा निषेध म्हणून येथील भाजयुमो कार्यकर्त्यांंनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर या नेत्यांचे पुतळे जाळले. नेत्यांचे पुतळे जाळल्यानंतर ह्यस्वाभिमानीह्णच्या कार्यकत्यार्ंनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत भाजयुमो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी केली. दरम्यान, पोलीसांनी जमाबंदी आदेश झुगारल्यामुळे कलम १३५ अन्वये मुंबई पोलीस कायद्यान्वये भाजयुमोच्या ८ ते १0 कार्यकर्त्यांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.'त्या' घटनेशी स्वाभिमानीचा संबंध नाही-तुपकरनांदुरा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री फुंडकर यांचा पुतळा जाळल्याचे वृत्त चुकीचे असून या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिले आहे. पीक विमा कंपन्याबरोबर झालेले करार हे ना. भाऊसाहेब फुंडकर व ना. सदाभाऊ खोत कृषिमंत्री होण्यापूर्वीचे आहेत. तरीसुद्धा दोषी अधिकार्‍यांवर चौकशी करून कारवाईचे निर्देश मंत्रीद्वयांनी दिले आहेत. अशी आंदोलने करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असून ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. समाधान भातुरकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या अगोदर संघटनेतून हकालपट्टी केली असून त्यांचा आणि स्वाभिमानीचा काहीही संबंध नसल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.