शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्यव्यापी संघर्ष करणार : डॉ. बाबा आढाव

By admin | Updated: June 2, 2014 22:52 IST

केंद्र शासनाने संरक्षण उत्पादन व प्रकल्पांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला आहे.

पुणे : केंद्र शासनाने संरक्षण उत्पादन व प्रकल्पांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला आहे. हा निर्णय अंतिम संरक्षणांसंबंधी प्रकल्पांकरता परकीय गुंतवणूकदार जमिनी ताब्यात घेतील आणि त्यामुळे विस्थापित होणार्‍यांनी आपल्याच देशातील सैन्यांशी संघर्ष करायचा काय? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे सरचिटणीस डॉ. बाबा आढाव यांनी येथे केला. धरण व प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांविषयी परिषदेची राज्यव्यापी बैठक रविवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकारी उदयोग समूहाचे अध्यक्ष वैभव नायकवडी हे होते. आढाव म्हणाले, देशात पुनर्वसनाचा कायदा करणारे पहिले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे.राज्याचा पुरोगामी चेहरा ठळक करणारा हा कायदा महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या लढ्यातून झाला. दिवगंत दत्ता देशमुख,नागनाथअण्णा नायकवाडी यांसारखे समर्थ व लढाऊ नेतृत्व लाभलेल्या या संघटनेसमोर आजचे हे नवे आव्हान उभे राहत आहे. धरण व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न राज्य सरकारने तातडीने न सोडविल्यास परिषद राज्यव्यापी संघर्ष करेल. तसेच धरणग्रस्तांविषयी कोणताही निर्णय सरकार परस्पर घेते. परिषदेने आपल्या लढ्यातून एवढी ताकद उभी करावी की असे निर्णय घेण्याआधी शासन परिषदेशी चर्चा करेल. बैठकीचे प्रास्ताविक परिषदेचे उपाध्यक्ष लक्ष्मण पासलकर यांनी केले. यावेळी महसूल विभाग निहाय राज्यातील पुनर्वसन कामाचा आढावा घेण्यात आला.