शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा; राज्य सरकारला शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:32 IST

महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळी प्रकरणांबाबत  पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने पहिल्या अहवालात काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.

महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क


मुंबई : राज्य महिला आयोगाकडे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे पोलिस स्टेशनला पाठविण्यापुरतीच मर्यादित जबाबदारी आहे. न्यायिक किंवा तपासणीचे अधिकार नसल्यामुळे आयोगाला मर्यादित कार्यकक्षेत काम करावे लागते, हे कायद्याला अभिप्रेत नाही. यासाठी आयोगाचे सक्षमीकरण देऊन त्याच्या अधिकारांमध्ये बदल व सुधारणा करून न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा, अशी शिफारस विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने राज्य सरकारला केली आहे.

महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळी प्रकरणांबाबत  पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने पहिल्या अहवालात काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. सरकारने आयोगाला दिलेला १० कोटी ६० लाख रुपये निधी कमी आहे. कार्यालयासाठी योग्य आणि पुरेशी जागा उपलब्ध नाही. मर्यादित अधिकारांमुळे प्राप्त तक्रारींवर तातडीने कारवाई होत नाही. पीडितांना मदत व दिलासा देण्यासाठी कोणतेही अधिकार नाहीत. आयोगाने नेमलेले तपास अधिकारी यांना अहवाल देणे बंधनकारक करून त्यावर कालमर्यादा निश्चित करावी, असे समितीने म्हटले आहे. 

किमान ३ वर्षे कालावधी द्यावा 
आयोगावर सदस्य सचिव म्हणून आयएएस अधिकारी नेमले जातात. पण बदल्यांमुळे दरवर्षी किमान ३ आयएएस अधिकारी सदस्य सचिव म्हणून बदलले जातात. बाल हक्क आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे अतिरिक्त कामकाजही त्यांच्याकडे असते. परिणामी, अधिकाऱ्यांना पूर्णवेळ काम करता येत नाही, ज्याचा आयोगाच्या कामावर थेट व अप्रत्यक्ष परिणाम होतो. त्यामुळे सदस्य सचिवांचा कार्यकाळ किमान ३ वर्षे करण्यासह त्यांना अतिरिक्त काम न देण्याची शिफारस समितीने केली आहे.

आकृतिबंधाचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा 
अनेक पदे रिक्त असल्याचा आयोगाच्या कामावर परिणाम होत आहे. सध्या १९९५ पासून ३५ पदांचा आकृतिबंध अस्तित्वात आहे. परंतु गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता, पदसंख्या वाढविण्याची गरज आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे ४५ पदांचा आकृतिबंध प्रस्तावित आहे. तो मंजूर करून रिक्त पदे तातडीने भरावीत. समुपदेशन अधिकाऱ्यांची संख्या वाढवावी, सर्व सदस्यांच्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात. निधी वाढवून आयोगाला स्वतंत्र कार्यालयही द्यावे, असे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासMaharashtraमहाराष्ट्र