शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पोलिसांची पुन्हा नाचक्की!

By admin | Updated: February 18, 2015 02:45 IST

कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला लिपिकने पोलिसांकडे व वरिष्ठांकडे केल्याने महाराष्ट्र पोलीस दलाची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे.

धक्कादायक : अतिरिक्त महासंचालकांवर महिला लिपिकचा विनयभंगाचा आरोपडिप्पी वांकाणी - मुंबईअतिरिक्त पोलीस महासंचालक आणि गृहरक्षक दलाचे उप महासमादेशक सुरिंदर कुमार यांनी विनयभंग केल्याची लेखी तक्रार त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला लिपिकने पोलिसांकडे व वरिष्ठांकडे केल्याने महाराष्ट्र पोलीस दलाची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे.सोमवारी दुपारी सुरिंदर कुमार यांनी कार्यालयात आपल्या अंगाला असभ्यपणे स्पर्श केला, अशी तक्रार या महिलेने केली आहे. मात्र १९८५ च्या तुकडीचे ‘आयपीएस’ अधिकारी असलेल्या ५९ वर्षीय सुरिंदर कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना याचा इन्कार केला. सुरिंदर कुमार म्हणाले, की हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे व अशा प्रकरणांत प्रसिद्धी माध्यमांशी बोलू नये, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांचा मी इन्कार करतो. पण याचा मी व तक्रारदार दोघांच्याही चारित्र्याशी संबंध असल्याने मी अधिक तपशिलात बोलणार नाही. कायद्याला त्याचे काम करू द्या. गृहरक्षक दल मुख्यालयातील एका सूत्रानुसार सुरिंदर कुमार यांनी या तक्रारदार महिलेकडे तिचे वैवाहिक संबंध व मुलांविषयी ३-४ दिवसांपूर्वी चौकशी केली होती. सोमवारी दुपारी १च्या सुमारास कुमार यांनी या महिलेस आपल्या दालनात बोलावून घेतले व तिच्या अंगाला असभ्यपणे स्पर्श केला, असे या महिला लिपिकचे म्हणणे आहे.सूत्रांनुसार बाहेर आल्यावर त्या महिने घडला प्रकार कार्यालयातील सहकाऱ्यांना सांगितला. त्या वेळी गृहरक्षक दलाचे महासंचालक अहमद जावेद कार्यालयात नव्हते. सायंकाळी चार वाजता अहमद जावेद आल्यावर या महिलेने घडलेली कथित घटना त्यांच्या कानावर घातली. अहमद जावेद यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की तक्रारदार महिलेने मला जेव्हा ही घटना सांगितली तेव्हा एक तर ती आमच्या कार्यालयाच्या महिला शाखेकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करू शकते, असे मी तिला सांगितले. तिने पोलिसांकडे तक्रार करण्याचा पर्याय निवडला. या महिलेने कुलाबा पोलिसांकडे सोमवारी रात्री लेखी तक्रार केली; पण त्यांनी अद्याप ‘एफआयआर’ नोंदविलेला नाही. आज सुटी असल्याने लगेच काही कारवाई केली नाही. बुधवारी काय प्रगती होते, ते पाहून योग्य ती कारवाई केली जाईल.-अहमद जावेद, महासंचालक, होमगार्डकुलाबा पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की तक्रारदार महिलेचे आपल्या पतीशी लफडे आहे, असे सांगत होमगार्ड्समधील एका लिपिकाच्या पत्नीने आॅफीसमध्ये गेल्या महिन्यात तमाशा केला होता. त्यामुळे गुन्हा नोंदविण्याआधी आम्ही शहानिशा करीत आहोत.