राज्यात मुसळधार

By Admin | Updated: July 22, 2014 01:48 IST2014-07-22T01:48:24+5:302014-07-22T01:48:24+5:30

नैऋत्य मोसमी पावसाची अनुकुलता वाढली असल्याने सोमवारी मराठवाडा वगळता राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला़

The state is in full swing | राज्यात मुसळधार

राज्यात मुसळधार

पुणो : नैऋत्य मोसमी पावसाची अनुकुलता वाढली असल्याने सोमवारी मराठवाडा वगळता राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला़ गेल्या 24 तासांत विदर्भातील देवरी येथे सर्वाधिक 11क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यापाठोपाठ महाबळेश्वरमध्ये 1क्क् मिमी पाऊस झाला. पुढील 48 तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा सोमवारी ओडिसा व पश्चिम बंगाल राज्यांकडे सरकला. असे असले तरी त्याची तीव्रता आज आणखी वाढली. याचबरोबर अरबी समुद्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा आज महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या किनारपट्टीवर होता.
या पट्टय़ांमुळे कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढली आहे. पुढील दोन दिवस ही तीव्रता अशीच राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यांवरही मुसळधार पाऊस पडत आहे. शिरगाव 
घाटात 14क् मिमी, दावडी घटात 
1क्क्, कोयना घाटात 8क्, अम्बोणो घाटात 5क्, ताम्हिणी घाटात 5क्, खोपोली घाटात 4क्, लोणावळा घाटात 4क् मिमी पाऊस पडला. (प्रतिनिधी)
 
राज्यातील पाऊस पुढीलप्रमाणो (मिमी)
भिरा 9क्, भामरागड 9क्, धानोरा 8क्, गडचिरोली 7क्, मालवण 6क्, माथेरान 6क्, गगनबावडा 6क्, मुरूड 5क्, चिपळूण 5क्, कर्जत 4क्, पोलादपूर 4क्, ब्रम्हपूरी 4क्, अलिबाग 3क्, महाड 3क्, पाली 3क्, o्रीवर्धन 3क्, संगमेश्वर 3क्, राधानगरी 3क्, शाहुवाडी 3क्, भंडारा 3क्, पनवेल 2क्, कणकवली 2क्, सावंतवाडी 2क्, वेंगुर्ला 2क्, उल्हासनगर 2क्, रोहा 2क्, पन्हाळा 2क्, इगतपुरी 2क्, बुलडाणा 2क्, दापोली 1क्, ठाणो 1क्, डहाणू 1क्, वैभववाडी 1क्, अंबरनाथ 1क्, चिखलदरा 1क्, नागपूर 1क्, चंद्रपूर 1क्.
 
च्अकोला व वाशिम वगळता नागपूर शहरासह ग्रामीण तालुके, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये सोमवारी सर्वत्र पाऊस झाला. या पावसामुळे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. 
च्गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने 5क् गावांचा संपर्क तुटला आहे. 
च्अहेरी आगारातून सोडण्यात आलेल्या बसफे:यांना फटका बसला. विदर्भात मान्सून सक्रिय झाल्यामुळे पेरण्यांना जोर आला आहे.

 

Web Title: The state is in full swing