शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात उद्यापासून राज्य चित्रपट महोत्सव

By admin | Updated: August 4, 2016 19:44 IST

माहिती आणि प्रसिद्धी संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित आठव्या राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन उद्या होईल

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ४ : माहिती आणि प्रसिद्धी संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित आठव्या राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन उद्या (दि. 5) सायंकाळी 5.30 वाजता कला अकादमीत उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते होईल. नाचुया कुंपासार चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडला जाईल.

उद्घाटन सोहळ्यास गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक तसेच माहिती आणि प्रसिद्धी सचिव दौलत हवालदार उपस्थित असतील. महोत्सवात 12 चित्रपटांचे खेळ होतील. यात नऊ कोकणी चित्रपट, दोन मराठी आणि एका लघुपटाचा समावेश आहे. निर्मोण, रोज तुं, एनिमी, होम स्वीट होम, होम स्वीट होम 2, एमएमएस, हाव तूं तूं हाव, हे कोकणी चित्रपट आहेत. तसेच गुरुपौर्णिमा आणि प्रेम अ‍ॅट फस्र्ट साईट हे मराठी चित्रपट तर द गेस्ट हा लघुपट पाहता येईल.

दरम्यान, दि. 7 रोजी समारोप सोहळ्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अभिनेता नाना पाटेकर, अभिनेता सचिन पिळगावकर, अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मृणाल कुलकर्णी यांची उपस्थिती लाभेल. समारोप सोहळ्यात गायिका बेला शेंडे यांचे खास गायन होईल. त्याचबरोबर एन. चंद्रा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. कोकणी चित्रपट विभागात 21 पुरस्कार, मराठी चित्रपट विभागात 21 पुरस्कार आणि लघुपटासाठी 7 पुरस्कार दिले जाणार आहेत