शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ५ हजार किडनी, तर १ हजार जण यकृताच्या प्रतीक्षेत; एक देहदान अनेकांसाठी जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 02:50 IST

अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादी वाढली : ८९ जणांना हवे हृदय, तर ४८ जणांना स्वादुपिंड

दीपक शिंदेसातारा : मानवासाठी प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. मृत्यूनंतर आपला अवयव एखाद्याच्या जीवनाला उभारी देणारा ठरला तर जीवन सार्थक होईल. सध्या राज्यात ५ हजार ४८७  जणांना किडनीची, तर १०९५ जणांनी यकृताची आवश्यकता आहे. १९ जण फुप्फुसाच्या, तर ८९ जण हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत. आज नाही तर उद्या एखादा अवयव मिळेल म्हणून अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात चकरा मारतात. 

दररोज उगवणारा दिवस अनेक पालकांसाठी नवी आशा घेऊन उगवत असतो. आज नाही तर उद्या अवयव मिळेल या प्रतीक्षेत अनेक जण आहेत. रुग्णालयातून आपल्या नातेवाइकाला अवयव मिळाला असा निरोप येण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत; पण आपल्या समाजात देहदानाऐवजी मृत्यूनंतर पंचतत्त्वात विलीन करण्याकडे अधिक कल आहे. आपले एक देहदान अनेकांसाठी जीवनदान असते याचा विचार होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. 

मृत व्यक्तीचे सर्वच अवयव उपयोगी येतात असे नाही. मात्र, अपघातामध्ये एखादी व्यक्ती गंभीर जखमी होऊन तिचा मेंदू मृत झाला तर तिच्या पालकांच्या संमतीने त्या व्यक्तीचे अवयव इतरांसाठी वरदान ठरू शकतात.  अवयव दानामध्येही रक्तगट जुळणे आणि अवयव जुळणे महत्त्वाचे असते. त्याबरोबरच याठिकाणी कोणताही वशिला उपयोगाचा ठरत नाही. त्यामुळे सरकारी प्रतीक्षा यादीनुसार अवयव आवश्यक असलेल्या व्यक्तीला ते दिले जातात. एखादी व्यक्ती खरंच अंतिम स्टेजवर असेल तरच त्याचा प्राधान्यक्रम लागतो. मात्र, हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होत असते. तोपर्यंत अनेकांना अवयवाच्या प्रतीक्षेत जीवही गमवावा लागतो. त्यासाठी अवयवदान ही एक चळवळ होणे आवश्यक आहे. काही सामाजिक संस्था यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांना समाजाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. 

अवयव प्रत्यारोपनापूर्वी आणि प्रत्यारोपनानंतर दोन्ही वेळेस रुग्णांची मानसिक तयारी करावी लागते. जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याला काही अंशी यशही येत आहे. तरीदेखील राज्य आणि देशभरात अनेक ठिकाणी अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते.  - धीरज गोडसे, संस्थापक,  कोमल न्यू लाइफ फाउंडेशन, सातारा 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल