शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

1 जानेवारीपासून बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात - नितिन गडकरी

By admin | Updated: September 13, 2016 17:02 IST

1 जानेवारीपासून 40 हजार कोटींच्या बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 -  1 जानेवारीपासून 40 हजार कोटींच्या बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात होईल. मुंबई - गोवा हायवे प्राथमिकता असून 2018 च्या आधी चार लेन सुरु करण्यात येतील. चार महिन्यांमध्ये 10 हजार कोटींच्या कामांचे आदेश जारी करण्यात येतील. तसंच 10 हजार कोटी खर्च करुन पंढरपूर वारीच्या रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे.
 
लोकांचं आयुष्य ही आमची प्राथमिकता आहे. महामार्गावर अपघाताची ठिकाणं शोधून त्याठिकाणी क्रॅश बॅरिअर सोलार लाईटचा वापर करुन स्पीड ब्रेकर्स तयार करण्यात येतील, यामुळे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी होईल असा विश्वास नितिन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
 
आपण पैसे किंवा इतर गोष्टींमध्ये कमी पडत नाही आहोत. मात्र आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. सर्व प्रक्रिया कायेदशीर झाल्या पाहिजेत असा आदेश देण्यात आला आहे. टॉयलेट पेपरसाठीही आम्ही टेंडर काढत आहोत मात्र त्याचवेळी वेळेची मर्यादाही पाळत आहोत  प्रलंबित राहणं टाळा हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील महत्वाकांक्षी प्रकल्पांना लवकरात लवकर पुर्ण करण्यात आग्रही आहेत असं नितिन गडकरी बोलले आहेत. 
 
पर्यावरणाबद्दल पुर्णपणे जागरुक असून एकही झाड कापायला न लागावं यासाठी प्रयत्न करत आहोत. ग्रीन हायवे तयार करण्यात येणार असून यामुळे प्रदूषण कमी होईल. गुजरातमध्ये एअरपोर्टप्रमाणे बसपोर्ट उभारण्यात येणार आहेत. बसपोर्ट उभे करण्यासाठी राज्यांनी आम्हाला जास्तीत जास्त जमीन देणं गरजेचं आहे कारण आम्हाला त्याची गरज आहे. महाराष्ट्रामधील रस्त्यांचं जाळं 2.5 ते 3 लाख किमीपर्यंत पसरवण्यात येईल असंही नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे. 
 
बंदरांची हाताळणी करण्यामध्ये गुजरातमधील अदानीपेक्षा महाराष्ट्राची कार्यक्षमता जास्त आहे. पनवेल ते जेएनपीटीसाठी 8 लेन बनवण्याचा प्रस्ताव आहे.  जलमार्ग, रेल्वे आणि त्यानंतर रस्ते हा आमच्या प्राथमिकतेचा क्रम असल्याचं नितीन गडकरींनी यानिमित्ताने स्पष्ट केलं. 
 
मालदिवमध्ये 47 समुद्र जहाज वाहतुकीचे रस्ते असताना आपल्याकडे एकही नाही. आपल्याकडे 13 हजार बेटे आहेत ज्यांचा अजिबात वापर होत नाही. जलवाहतूकीसाठी 20 हजार किमी जलमार्ग आणि 7.5 हजार किमी समुद्रकिनारा असताना आपण काहीतरी करण्यापेक्षा फक्त चर्चात करतो अशी खंत गडकरींनी बोलून दाखवली. माल मुंबईहून लंडनला पाठवणं हे मुंबईहून दिल्लीला पाठवण्यापेक्षा जास्त सोपं आहे. हे बदलण्याची गरज असल्याचं मत गडकरींनी व्यक्त केलं.
 
कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मनमाड ते इंदोर मुख्य रेल्वे मालवाहतूकमार्ग असेल. सोबतच आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या स्वस्त कार भारतात तयार केल्या जातील अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.
 
काही पर्यावरणवादी सतत विकासाच्या कामांना विरोध करत असतात. वांद्रे - वरळी सी लिंकचं बांधकाम सुरु असताना हा अनुभव आला. फक्त 7 लोकांनी एकूण 125 याचिका दाखल केल्या होत्या असं नितिन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.  मुंबईतील समुद्रकिना-यांवर घाण वास येत असतो. कचरा समुद्रकिना-यात टाकण्यापासून आपण रोखू शकत नाही का ? कच-यासोबत प्लास्टिकचाही निचरा केला जाऊ शकतो. आणण तो करणे गरजेचे आहे असं आवाहन नितिन गडकरी यांनी यावेळी केलं.
 
 विकासाचा सर्वात जास्त फायदा कृषी उद्योगाला होईल. मुंबई आणि महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. दोघेही देशाच्या विकासाची इंजिन आहे. मी दिल्लीत बसलेलो महाराष्ट्राचा अॅम्बेसिडर आहे असं नितिन गडकरी बोलले आहेत.