शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

"विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शाळा सुरू करा; प्रत्येक पाऊल जपून टाकावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 12:47 IST

शाळा सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा मुलांसाठी आनंदाचा क्षण  असला तरी मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड, पण अत्यंत महत्त्वाचा प्रयोग असणार असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

सीमा महांगडे -

मुंबई : लवकरच शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. पण विद्यार्थी दीड वर्षाहून अधिक काळ घरात आहेत. त्यांना काही दिवसांत शाळेत पाठवायचा निर्णय घेताना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार आहे. शाळेत जाणारे मूल हे शाळा प्रशासन व पालक या दोघांच्या केंद्रस्थानी राहील, यासाठी आखणी करणे गरजेचे असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ आणि चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य व्यक्त करीत आहेत.

शाळा सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा मुलांसाठी आनंदाचा क्षण  असला तरी मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड, पण अत्यंत महत्त्वाचा प्रयोग असणार असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शाळा सुरु करणे हा स्वागतार्ह निर्णय असून मुलांच्या उपस्थितीबाबत शिक्षण विभागाने ठेवलेली लवचिकता महत्त्वाची असल्याचे मत चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य आणि मुलांच्या वर्तन विकासातील तज्ज्ञ समीर दलवाई यांनी व्यक्त केले. मागील दीड वर्षाहून अधिकच्या काळात मुलांच्या खाण्याच्या, बसण्याच्या, शिस्तीच्या सवयीत बदल झाल्याने ते हळूहळू पूर्ववत होईल याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. तसेच शाळा सुरु झाल्यावर अभ्यासक्रम कसा, कुठून, केवढा असायला हवा यायचे नियोजन करायला हवे. त्यामुळे मुलांना एकदम अभ्यासाचा ताण येणार नाही, असे मत त्यांनी मांडले. 

चाईल्ड टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचा अवलंब शाळा सुरु करताना होईलच मात्र या शिवाय हायब्रीड मॉडेल म्हणजे काही दिवस ऑनलाइन, काही दिवस ऑफलाइन अशा पद्धतीने वर्गांचे नियोजन केल्यास मुलांना वातावरणात पूर्ववत होण्यास मदत होईल असा सल्ला चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी दिला. 

याशिवाय स्वच्छतागृहांची, वर्गांची, बाकांची स्वच्छता आवश्यक आहेच मात्र मुलांचा डब्बा, पिण्याचे पाणी त्यांनी स्वतः आणले पाहिजे. सुरुवातीच्या शाळांच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भागापेक्षा भावनिक, मानसिक भागावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास मुलांसाठी सोयीचे ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

‘संवाद साधणे गरजेचे’शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांसह पालकांनी अभ्यास एके अभ्यास करून चालणार नाही तर सुरुवातीच्या काळात संवाद, गप्पा गोष्टी यांच्यातून मुलांना मोकळे करायला हवे. त्यांना असलेला मानसिक ताण, कोंडी यातून ते बाहेर पडतील याची काळजी घ्यायला हवी.  

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार