शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता एसटीचे ‘कुटुंब सवलत कार्ड’

By admin | Updated: September 8, 2014 03:06 IST

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून नवनविन प्रयोग अणि बदल घडविले जात आहेत. याच बदलाचा एक भाग म्हणून एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या वार्षिक सवलत कार्ड योजनेत बदल करण्यात आला आहे

मुंबई : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून नवनविन प्रयोग अणि बदल घडविले जात आहेत. याच बदलाचा एक भाग म्हणून एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या वार्षिक सवलत कार्ड योजनेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी एका प्रवाशाला देण्यात येणाऱ्या या सवलतीत आता या प्रवाशासह कुटुंबातील अन्य तीन प्रवाशांनाही सामावून घेता येणार आहे. या एका कार्डासाठी मोजाव्या लागणाऱ्या शुल्कात ३00 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे वार्षिक सवलत कार्ड योजना शिवनेरीतही एका प्रवाशामागे सुरु करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून साध्या बस सेवांसाठी वार्षिक सवलत कार्ड योजना प्रवाशांसाटी सुरु आहे. पूर्वी एका प्रवाशामागे २00 रुपये या कार्डसाठी मोजावे लागत होते. या कार्डमुळे त्या प्रवाशाला प्रवासात १0 टक्के सूट दिली जाते. मात्र आता या योजनेत प्रवासी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बदल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. आता एका प्रवाशाबरोबरच त्याच्या कुटूंबातील अन्य तीन जणांना या सवलतीत सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २00 रुपयांऐवजी ५00 रुपये मोजावे लागतील आणि प्रवासात दहा टक्के सूट मिळणार आहे. त्याचबरोबर या कार्डाच्या नूतनीकरणाही बदल करण्यात आला असून पूर्वी २00 रुपये नुतनीकरणास लागत असतानाच आता पहिल्या नुतनीकरणासाठी १८0 रुपये, दुसऱ्या नुतनीकरणासाठी १६0 तर तीसऱ्या नुतनीकरणासाठी १५0 रुपये लागतील. हे वार्षिक सवलत कार्ड योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून विमा कवचही देण्यात येते. यात बदल करताना आता १ लाख रुपयांऐवजी त्याची रक्कम वाढवून दीड लाख इतकी करण्यात आली आहे. तर नुतनीकरण करणाऱ्या प्रवाशासाठी २ लाख रुपयांचे विमा कवच दिले जाणार आहे.