एसटी, दुचाकीच्या धडकेत युवक ठार

By Admin | Updated: May 5, 2016 20:55 IST2016-05-05T20:55:09+5:302016-05-05T20:55:09+5:30

मोहळ-पंढरपूर रस्त्यावर एस.टी. ने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी व एस.टी.चा अपघात झालाची घटना गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे

ST, a biker, killed the youth | एसटी, दुचाकीच्या धडकेत युवक ठार

एसटी, दुचाकीच्या धडकेत युवक ठार

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ५ : तुगंत (ता. पंढरपूर) येथील मोहळ-पंढरपूर रस्त्यावर एस.टी. ने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी व एस.टी.चा अपघात झालाची घटना गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. यामध्ये मयत झालेल्या युवकाचे नाव पवन अजित पवार (वय ११, रा. उबंरगाव, ता.पंढरपूर) असे आहे.
अजित सुखेदव पवार (वय ४२, रा. उबंरगाव, ता. पंढरपूर) हे मुलगी प्रज्ञा व पवन यांच्यासह एम.एच. १३ बी. झेड. ७५२२ या दुचाकी मोटार सायकल वरुन पंढरपुरकडे येत होते. या दरम्यान तुगंत (ता. पंढरपूर) येथील शिंगाडे हॉटेल जवळ पोहचले, असता समोरील एम. एच. १४ बी. जे. २८६२ ही एस.टी चालक आण्णासाहेब वसंतराव राऊत (रा. सांगोला) यांनी अचानक ब्रेक मारला. यामुळे मागील अजित सुखेदव पवार हे एस.टी. ला जबरदस्त धडकले. या अपघातात त्यांचा मुलगा पवन पवार यांचा मृत्यू झाला. व ते स्वत: व प्रज्ञा हे दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत पुढील तपास पोना. व्ही. सी. काळे करीत आहेत.

Web Title: ST, a biker, killed the youth