शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
3
रुपया ९६ पार, इतिहासात पहिल्यांदा डॉलरच्या तुलनेत इतकी कमकुवत झाली भारतीय करन्सी; सामान्यांवर काय परिणाम होणार?
4
अमित शाह यांना धमकी देणं भोवलं, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर बंगालमध्ये गुन्हा दाखल; कारवाई होणार
5
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
6
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
7
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
8
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
9
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
10
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
11
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
12
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
13
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
14
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
15
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
16
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
17
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
18
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
19
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
20
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी उपहारगृहात ‘स्पेशल अनहेल्दी मेन्यू’

By admin | Updated: June 26, 2017 02:43 IST

लहान वयातच ‘अनहेल्दी’ पदार्थ सेवन केल्यास मुलांच्या वाढीवर, आरोग्यावर दुरगामी परिणाम दिसून येतात. शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लहान वयातच ‘अनहेल्दी’ पदार्थ सेवन केल्यास मुलांच्या वाढीवर, आरोग्यावर दुरगामी परिणाम दिसून येतात. शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून ८ मे २०१७ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, शाळांच्या उपहारगृहात ‘एचएफएसएस फूड’ (जास्त प्रमाणात फॅट, साखर, मीठ असणारे पदार्थ आणि पेय) ठेवण्यास व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली. शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन घेतलेल्या या निर्णयाची मात्र मुंबईतील शाळांमध्ये पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत रिअ‍ॅलिटी चेक’मधून उघड झाले. काही शाळांनी जंक फूड बंद केले असले तरीही सकस आहार कोणत्याच शाळेच्या उपहारगृहात उपलब्ध नाही.
मे महिन्यात शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शाळांच्या उपहारगृहात होते की नाही, हे तपासून पाहण्यासाठी लोकमत प्रतिनिधींनी काही शाळांना भेटी दिल्या. पण, यावेळी पदरी निराशाच पडली. शाळेच्या उपहारगृहांमध्ये शासन निर्णयानुसार बंदी घातलेल्या पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स यासारख्या अति तेलकट, मीठ अथवा गोड असणाऱ्या पदार्थांची रेलचेल होती. मधल्या सुटीत उपहारगृहातील ‘अनहेल्दी’ पदार्थांवरच विद्यार्थी ताव मारत असल्याचे दिसून आले.
काही शाळांमध्ये जंकफूड बंदी असली तरीही, चॉकलेट्स, गोळ््या, वडापाव, कोल्डडिंक्स हे खुलेआमपणे विकले जातात. या पदार्थांच्या विक्रीमध्ये काहीच गैर असल्याचे समजले जात नाही. शासन निर्णयामध्ये कोणते पदार्थ नको याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने कोणते पदार्थ उपहारगृहात असावेत, याचीही यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी कोणताच पदार्थ शाळांच्या उपहारगृहात उपलब्ध नसतो. याविषयी विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची जनजागृती केल्याचे दिसून येत नाही.