शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उलटले; तपासणी पथक लागले कामाला!

By admin | Updated: July 28, 2014 01:55 IST

अकोला जिल्ह्यातील पेरलेले महागडे बियाणे उगवलेच नाही, मंगळवारी मिळणार बियाणे तपासणी अहवाल.

अकोला : जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील महाबीज व इतर खासगी कंपन्यांचे पेरलेले सोयाबीन महागडे बियाणे उगवलेच नसल्याने कृषी अधिकारी, कंपन्यांच्या अधिकार्‍यांची धांदल उडाली असून, बियाणे तपासणी पथक कामाला लागले आहेत. शनिवारी ज्या सोयाबीन क्षेत्रावरील बियाण्यांचे नमुने घेण्यात आले आहेत, त्याचा तपासणी अहवाल मंगळवारी येणार आहे. त्यामुळे या अहवालाकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. यावर्षी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊ स झाल्यानंतर शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. आजमितीस जिल्हय़ात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. १५ व २३ जुलै रोजी पडलेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणीचा वेग वाढवल्याने गुरुवारपर्यंत ६५ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. हा पाऊस सोयाबीन पिकाला पोषक ठरणार असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि पोषक ठरण्याऐवजी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन उगवलेच नाही. गेल्यावर्षी अतवृष्टीने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले तर यावर्षी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यात सर्वाधिक महाबीजच्या बियाण्यांचा समावेश असून, खासगी कंपन्यांचे बियाणे काही ठिकाणी उगवले नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. अकोला तालुक्यात कौलखेड जहाँगीर, रामगाव, खडकी, बोंदरखेड, चांचोडी आदी अनेक गावच्या शेतकर्‍यांचे सोयाबीन उगवले नाही. या संदर्भात शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या आहेत. गतवर्षी शेतकर्‍यांनी पीक विमा काढला असता आणि आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असताना विमा कंपनीकडून संबंधित शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक अडचणीत असताना यावर्षी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे.