शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकात गंधकाचा वापर वाढवणार!

By admin | Updated: September 20, 2015 22:44 IST

दुय्यम अन्नद्रव्याचे समतोल प्रमाण वाढविण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा भर.

अकोला : विदर्भाच्या जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे सातत्याने चिंताजनक निष्कर्ष समोर येत असून, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाने भर दिला आहे. याकरिता शेतकर्‍यांच्या शेतावर शेती दिन घेण्यात येत असून, सोयाबीनमधील कमी झालेले गंधक, दुय्यम अन्नद्रव्याचे प्रमाण भरू न काढण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विदर्भातील जमिनीमध्ये ९७.३६ टक्के नत्राची कमतरता आढळून आली आहे. स्फुरद ४९.४0, गंधक २0.४५ व जस्त ५0.७७ टक्के आढळून आले आहे. त्याचप्रमाणे लोह, पालाश, बोरॉन या अन्नद्रव्यांचे प्रमाण घटल्याचे आढळले आहे. हे प्रमाण या आधीच्या अभ्यासातील प्रमाणापेक्षा कमी झाले आहे. दोन वर्षात कोणताच बदल झाला नसून, खताच्या वापरात आणखी वाढ झाली आहे. त्यासाठी जमिनीचे आरोग्य सुधारणे गरजेचे असून, अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार खतांचा योग्य वापर करावा लागणार आहे. भौगालिक स्थळ प्रणालीवर आधारित माहितीचा वापर पिकांच्या शाश्‍वत उत्पादकतेसाठी करावा लागणार आहे. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतासोबतच संतुलित खत व्यवस्थापन करावे लागणार आहे. सोयाबीन पिकातील गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिके, प्राणी व मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या विषयावर शेती दिनाचे कार्यक्रम शेतकर्‍यांच्या शेतावर घेण्यात येत असून, शुक्रवारी वाशिम जिल्हय़ातील चिखली या गावी शेती दिन घेण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र करडा व डॉ. पंदेकृविच्यावतीने शेतकर्‍यांना गंधक व दुय्यम अन्नद्रव्याचे सोयाबीन पिकावरील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या संदर्भातील माहिती पत्रके शेतकर्‍यांना वितरित करण्यात आली. शेतकर्‍यांनी संतुलित खतांचा वापर करावा, हा या मागील उद्देश आहे. संतुलित गंधकाच्या वापरामुळे पिकांची योग्य वाढ, शेंगा व दाणे भरल्याचे शेतकर्‍यांना दाखविण्यात आले. याच पद्धतीने शेती दिन कार्यक्रमाला यावर्षी सुरुवात झाली आहे. सोयाबीन पिकाच्या शेत जमिनीमध्ये गंधक व दुय्यम अन्नद्रव्याचा वापर अर्थात संतुलित खताचे प्रमाण कसे असावे, यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन करू न शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत असल्याचे मृद व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रमुख प्रा. डी.बी.तामगाडगे यांनी सांगीतले.