सोनईत सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: March 31, 2015 03:31 IST2015-03-31T03:31:20+5:302015-03-31T03:31:20+5:30

राजेगाव (ता. नेवासा) येथील महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या मुलाच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याच्या आरोपावरून ४ जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आ

Sonate gang rape | सोनईत सामूहिक बलात्कार

सोनईत सामूहिक बलात्कार

सोनई (जि.अहमदनगर) : राजेगाव (ता. नेवासा) येथील महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या मुलाच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याच्या आरोपावरून ४ जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीससूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की २९ मार्चला रात्री १२ च्या दरम्यान आरोपी शिवाजी महादेव शिरसाठ, लक्ष्मण पुंजा घुले, भागवत बन्सी घुले, संदीप रामकृष्ण शिरसाठ (सर्व रा. राजेगाव) यांनी पीडित महिलेच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तुझ्या पतीने माझ्या मुलीच्या लग्नाची माहिती इतरत्र पसरवली व धार्मिक सप्ताहाचा हिशोब दिला नाही, असे म्हणत आरोपींनी पीडित महिलेच्या मुलाला मारहाण करून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावले तसेच बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़

Web Title: Sonate gang rape