शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 20:26 IST

बेदाग प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. टीका करणारे करत राहतील, पण मोदीजी काम करत राहतील. ‘सबका साथ, सबका विकास’ हा देशाचा मंत्र बनला आहे असं शिंदेंनी म्हटलं.

मुंबई -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित ठेवावे. भविष्यात जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा मोदींचा करिष्मा काय होता हे सर्वांना कळेल. या पुस्तकातील काही भाग शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करायला हवा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या पुस्तकातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत लेखक बर्जिस देसाई यांनी लिहिलेले ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे पार पडले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर यापूर्वी अनेक पुस्तके आणि चित्रपट आले आहेत. मात्र ‘मोदीज मिशन’ हे केवळ चरित्र नसून त्यांच्या कार्याचा, दृष्टिकोनाचा आणि संघर्षाचा सत्यदर्शी आलेख आहे. मोदींचे व्यक्तिमत्व एका पुस्तकात सामावणे अशक्य आहे. मोदी हे नाव देशाचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही आहे. मिशन इम्पॉसिबल हा चित्रपट आला, पण नरेंद्र मोदींनी गेल्या अकरा वर्षांत खरोखरच ‘इम्पॉसिबल’ काम शक्य करून दाखवले आहे. या काळात देशात झालेला बदल हा सकारात्मक आणि व्यावहारिक आहे. आज जग भारताकडे आदराने पाहत आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मोदींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि आईचे आशीर्वाद आहेत. कामाप्रती डेडिकेशन व डिवोशन ही त्यांची ओळख आहे. मेहनतीचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी. गुजरातच्या वडनगरमधून देशाला असा हिरा लाभला, ज्याने करोडो कष्टकऱ्यांचे जीवन उजळून टाकले आहे. फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या वातावरणात सत्य मांडण्याचे धाडस दाखवल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी लेखक बर्जिस देसाई यांचे कौतुक केले. 

दरम्यान, आज भारताची अर्थव्यवस्था जगात ११ व्या स्थानावरून चौथ्या स्थानी आली आहे आणि लवकरच ती तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. हे मोदींमुळेच शक्य झाले आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यांद्वारे भारताचा डंका जगभर वाजत आहे. मोदींनी शेतकऱ्यांचे आणि गरीबांचे जीवन बदलले आहे. २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. याआधी ‘गरीबी हटाव’चा नारा देण्यात आला पण गरीबच हटवले गेले, मात्र मोदींनी खरोखरच गरिबी हटवली असा टोला एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला लगावला. 

"लोकांच्या हृदयावर राज्य करणारा एकच नेता नरेंद्र मोदी" मोदींनी महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांना सन्मान मिळवून दिला. गेल्या अकरा वर्षांत देशाचा विकास वेगाने झाला आणि भ्रष्टाचाराचा एकही डाग मोदींवर लागला नाही. बेदाग प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. टीका करणारे करत राहतील, पण मोदीजी काम करत राहतील. ‘सबका साथ, सबका विकास’ हा देशाचा मंत्र बनला आहे. मोदींची अकरा वर्षांची कारकीर्द हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. लोकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता कोण, याचे उत्तर फक्त एकच नरेंद्र मोदी असं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Include 'Modi's Mission' in school curriculum: Eknath Shinde's demand.

Web Summary : Eknath Shinde requests inclusion of 'Modi's Mission' in school textbooks, praising Modi's impact and vision. He highlighted India's economic growth under Modi and lauded his dedication to serving the poor, contrasting it with past slogans.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस