पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 17:22 IST2021-11-14T17:21:47+5:302021-11-14T17:22:14+5:30

Soldier Shahid : सावखेडा बुद्रूक ता.पाचोरा येथील रहिवासी असलेले जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (३५) हे शहीद झाले.

Solider of Maharashtra martyred in the attack at Pathankot | पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान शहीद

पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान शहीद

पाचोरा जि. जळगाव  : पठाणकोट येथे झालेल्या एका हल्ल्यात सावखेडा बुद्रूक ता.पाचोरा येथील रहिवासी असलेले जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (३५) हे शहीद झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, जवान शहीद झाल्याचे कळताच परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली आहे.  


शहिद मंगलसिंग हे ३९ - ई.एम.ई. मध्ये नायक पदावर कार्यरत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण  सावखेडा  बुद्रूक  जि. प.शाळेत तर  वरखेडी विद्यालयात  १० वी पर्यंतचे शिक्षण झाले. वयाच्या १८ वया वर्षीच ते सैन्यदलात भरती झाले.
 

सेवापूर्तीला एक वर्ष  बाकी असतांनाच त्यांना वीर मरण आले. पंधरा दिवसांपूर्वीच सावखेडा येथून सुटी घालवून कर्तव्यावर हजर झाले हेाते.  मंगलसिंग यांच्या पश्चात आई - वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी, दोन मुली व मुलगा आहे. मोठे भाऊ अनिल व देवीलाल हे शेती करतात सोबत पिठाची गिरणी चालवून उपजिवीका चालवतात. मुलगा शहीद झाल्याचे त्यांच्या वडिलांना सांगण्यात आलेले नाही.

Web Title: Solider of Maharashtra martyred in the attack at Pathankot