शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'लालबागच्या राजा'साठी सोलापुरी साज

By admin | Updated: September 8, 2016 19:56 IST

वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतो त्या लाडक्या गणरायाचे संपूर्ण राज्यभरात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले आहे.

मिलिंंद राऊळ, ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 8 - वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतो त्या लाडक्या गणरायाचे संपूर्ण राज्यभरात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले आहे. सोलापुरातही हा जल्लोष कमी नाही, उत्सव मग कोणताही असो त्यात सोलापूर नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. या जोडीलाच भक्तीलाही इथे सीमा नाही. सोलापुरातील तीन कुटुंबांनी निस्सीम भक्तीपोटी मुंबईच्या लालबागच्या राजाला तब्बल २१ फूट लांबीच्या दुर्वा आणि आघाड्यापासून हार तयार केला आहे. त्याचे वजन तब्बल २५ किलो असून, लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यासाठी तो सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईकडे बुधवारी रवाना झाला आहे.सोलापुरातील सम्राट चौकातील वीरकर गणपती परिसरात राहणारे रामचंद्र सिद्रामप्पा हाक्के, सतीश शांतवीरप्पा माळी आणि प्रसाद बसवंती कुटुंबीय गणरायाचे निस्सीम भक्त आहेत. या भक्तीतूनच त्यांनी गेल्या वर्षापासून दर गणेशोत्सवाला लालबागच्या गणपतीला दुर्वा आणि आघाड्याचा हार तयार करुन तो मुंबईला नेऊन ह्यश्रींह्णच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प सोडला आहे. यंदा हे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना हाक्के-माळी-बसवंती या त्रिमूर्र्तींनी देवासाठी तयार केलेल्या या हारामुळे मनाला आत्मिक शांती मिळत असल्याचे प्रांजळपणे नमूद केले. अलीकडच्या काळात सोलापूरचा पट्टा तसा दुष्काळी म्हणूनच जाऊ लागला आहे. या समस्त सोलापूरकरांवर विघ्नहर्त्या लालबागच्या राजाची कृपा राहावी, पाऊसपाणी येऊन चांगले पीक येऊ दे, बळीराजाच्या अंगणात समृद्धी येऊ दे असे साकडे आम्ही घालणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.------------------------------------दहा जणांनी घेतली मेहनत२१ फूट लांब आणि २५ किलो वजनाचा दुर्वाचा हार तयार करण्यासाठी १० जणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. हा संपूर्ण हार तयार करण्यासाठी तब्बल आठ तास लागले; मात्र हे करताना एक अनामिक समाधान लाभले. चौफेर डंका असलेल्या लालबागच्या राजाच्या गळ्यात घालण्यासाठी तयार होणारा हा हार आपणास माळण्याची संधी मिळाली ही त्या विघ्नहर्त्या गणेशाचीच कृपा असल्याच्या भावना रामचंद्र सिद्रामप्पा हाक्के, सतीश शांतवीरप्पा माळी आणि प्रसाद बसवंती यांनी व्यक्त केल्या.