पनवेल महानगरपालिका मुख्यालयात आग, धुराचे लोट पसरल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:04 IST2025-10-09T17:02:44+5:302025-10-09T17:04:18+5:30
पनवेल महानगर पालिका मुख्यालयात तळ माजवल्यावर ठेवलेल्या मुख्यालयात वीजपुरवठा करणाऱ्या जनरेटरला आग लागली.

पनवेल महानगरपालिका मुख्यालयात आग, धुराचे लोट पसरल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ
वैभव गायकर,पनवेल: पनवेल महानगर पालिका मुख्यालयात तळ माजवल्यावर शत्रपती संभाजी मैदान परिसरात ठेवलेल्या मुख्यालयात वीजपुरवठा करणाऱ्या जनरेटरला आग लागल्याची घटना आज (९ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. जवळच असलेल्या पालिकेच्या अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली.
अचानक पालिका मुख्यालयात धुराचे लोट उठल्याने संपूर्ण पालिका मुख्यालयातील कर्मचारी अधिकारी वर्गात भीती पसरली. यामुळे सर्व कर्मचारी खाली उतरले. आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात आले. आग पालिका मुख्यालयात तळ मजल्यावर बँकअपसाठी ठेवलेल्या जनरेटरला लागली, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे यांनी दिली. विशेष म्हणजे, धुराचे लोट उठल्याने ते पाहण्यासाठी कर्मचारी खाली उतरल्याची माहिती गावडे यांनी दिली.
अनधिकृत पार्किंगचा अग्निशमन दलाला अडथळा
पालिका मुख्यालयाला लागुनच पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग आहे.त्वरित गाडी याठिकाणी दाखल झाली.मात्र नेहमी प्रमाणे पालिका मुख्यालयाला पडलेला अनधिकृत पार्किंगचा वेढ्यामुळे या अग्निशमन बंबाला जागेवर पोचण्यास अडथळा निर्माण झाला.