शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

बिले थकविणाऱ्यांना ‘कारणे दाखवा’

By admin | Updated: January 18, 2015 01:22 IST

आदेश देऊनही ही बिले तयार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण मंडळाच्या तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

पुणे : महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळांमधील मुलांची वाहतूक करणाऱ्या तब्बल २३ रिक्षाचालकांची थकीत बिले देण्याचे आदेश देऊनही ही बिले तयार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण मंडळाच्या तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. दरम्यान, या रखडलेल्या बिलांसाठी पुणे जिल्हा शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने शनिवारी थकीत बिलांसाठी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. त्यात रिक्षाचालक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक सहभागी झाले होती. या वेळी या नागरिकांनी महापौर दत्तात्रय धनकवडे यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत येत्या सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत रिक्षाचालकांना थकीत बिले देण्याचे आश्वासन शिक्षणप्रमुख बबन दहिफळे यांनी दिले.महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार करण्याच्या हेतूने महापालिका शिक्षण मंडळाने हडपसर, येरवडा आणि दत्तवाडी येथे क्रीडा निकेतन शाळा सुरू केल्या आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत ही शाळा भरते. सकाळचा व्यायाम आणि इतर प्रशिक्षणासाठी शहराच्या कानाकोपऱ्यांतून विद्यार्थी येतात. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी स्कूल बस आणि रिक्षांची व्यवस्था केली आहे. मात्र, शिक्षण मंडळाने जुलै ते डिसेंबर या महिन्यांचे तब्बल आठ लाख रुपयांची बिले थकविली आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांनी १५ दिवसांपासून बंद पुकारला असून, विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडणे बंद केले आहे. ही बिले तत्काळ मिळावीत यासाठी आंदोलन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केल्याने कारवाईया प्रकरणी महापौर दतात्रय धनकवडे यांनी बैठक घेतली. या बैठकीस दहिफळे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, संघटनेचे अध्यक्ष संपत पाचरणे यांच्यासह शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी, शिक्षण मंडळ सदस्य लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते. या वेळी ही जुलै ते आॅक्टोबरपर्यंतची बिले तातडीने देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मंडळाकडून ती कार्यवाही झाली नसल्याचे जगताप यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. या वेळी दहिफळे यांना काहीच उत्तर देता आले नाही. तसेच ही बिले मागील ९ जानेवारीला पालिकेकडे आल्याचेही जगताप यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दुपारी मंडळात जाऊन जगताप यांनी तपासणी केली असता, तीन कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे दिसून आले असून, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असल्याÞचे जगताप यांनी सांगितले.