शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकाच्या निवृत्तीला छमछमचा ठेका!

By admin | Updated: June 9, 2014 14:36 IST

खालापूर येथील एका फार्महाउसवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची टीप मिळाल्याने पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा टाकलेल्या धाडीतून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

नवी मुंबई : खालापूर येथील एका फार्महाउसवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची टीप मिळाल्याने पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा टाकलेल्या धाडीतून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. नवी मुंबईतून (झोन-२) पोलीस अधीक्षकपदावरून निवृत्त झालेल्या सुरेश पवार यांच्या ‘कृतज्ञते’साठी ही पार्टी आयोजित केल्याची माहिती पुढे येत असून, मद्याचे पाट, मुजऱ्याचा ठेका आणि अश्लील अवस्थेत थिरकरणारी पावले बघून कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीसही स्तिमित झाले. या छमछम पार्टीतून पोलिसांनी १२ मुलींना ताब्यात घेतले आहे.जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या कलोते गावाबाहेर धरणाशेजारी मुंबईतील ए.आर. खत्री यांचे फार्महाउस आहे. या फार्महाउसवर रेव्ह पार्टी सुरू असल्याच्या माहितीवरून खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी बी.पी. कल्लुरकर यांनी रात्री ११नंतर छापा घातला. या वेळी सुरेश पवारसह मिलिंद पंडित, दीपक चौधरी, अहमद खान, संजय चौधरी, शेखर देवळेकर, संजय कामत, समीर शिंदे, रवींद्र राजापूरकर, अब्दुल खिलल, सईद खान, राजेश श्रोप, चंदरपाल अगरवाल, दीपक छोडा, राजेश सबनानी (सर्व रा. मुंबई) यांच्यासह १२ मुलींना ताब्यात घेतले. दरम्यान, पवार यांच्यासह उर्वरित चार जणांकडे मद्यपान करण्याचा परवाना असल्याने कारवाई केली नसून, अन्य १२ मुली आणि ६ पुरुषांवर विनापरवाना मद्यपानासह अश्लील, असभ्य वर्तणुकीखाली कारवाई केल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी कल्लुरकर यांनी दिली.या धाडीत १ लाख १० हजार रुपये आणि मद्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी दुपारी यातील सर्व आरोपींना खालापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पुरुष आरोपींना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा, तर मुलींना प्रत्येकी १२०० रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.