शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक निर्णयाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तडा; खुल्या प्रवर्गाची दारे आता कायमची बंद

By गणेश वासनिक | Updated: May 15, 2026 19:57 IST

Amravati : राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या लाखो मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मोठा तडा गेला आहे.

अमरावती : राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या लाखो मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मोठा तडा गेला आहे. राखीव प्रवर्गातून वयोमर्यादा किंवा इतर सवलती घेणाऱ्या उमेदवारांना आता गुणवत्तेच्या जोरावर खुल्या प्रवर्गातील जागा मिळवता येणार नाहीत. सरकारच्या या भूमिकेमुळे मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.

काय आहे नेमका निर्णय?

सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, जर एखाद्या उमेदवाराने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा इतर कोणत्याही राखीव प्रवर्गातून वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षेच्या संधींमध्ये थोडी जरी सवलत घेतली असेल, तर त्याची निवड फक्त आणि फक्त राखीव प्रवर्गातूनच होईल. तो उमेदवार कितीही गुणवंत असला, तरी त्याला खुल्या प्रवर्गातील जागेवर हक्क सांगता येणार नाही.

अन्यायाची प्रमुख कारणे :

गुणवत्तेचा अपमान : मागासवर्गीय उमेदवार जर खुल्या प्रवर्गातील कट-ऑफपेक्षा जास्त गुण मिळवत असेल, तर तो त्याच्या गुणवत्तेच्या जोरावर ती जागा मिळवण्यास पात्र असतो. मात्र, केवळ वयाची सवलत घेतली म्हणून त्याला खुल्या प्रवर्गातून बाहेर काढणे हा गुणवत्तेचा अपमान मानला जात आहे.

खुल्या जागांवर 'अघोषित' आरक्षण : खुल्या प्रवर्गाच्या जागा या सर्वांसाठी खुल्या असणे अपेक्षित आहे. मात्र, या निर्णयामुळे या जागा आता केवळ अराखीव प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

आरक्षणाच्या उद्देशाला हरताळ : आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे. गुणवंत मागासवर्गीय उमेदवाराने खुल्या प्रवर्गातून जागा मिळवली, तर राखीव प्रवर्गातील जागा दुसऱ्या गरजू मागासवर्गीय उमेदवाराला मिळते. आता मात्र, गुणवंत उमेदवारालाही राखीव जागेतच राहावे लागणार असल्याने खालच्या क्रमांकावर असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संधी हुकणार आहेत.

स्पर्धा अधिक तीव्र होणार : या निर्णयामुळे राखीव प्रवर्गातील कट-ऑफमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून, ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय तरुणांना नोकरी मिळवणे अधिक कठीण होणार आहे.

"या निर्णयामुळे प्रशासनातील बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व कमी होईल, ‘सवलत म्हणजे गुणवत्ता नव्हे’ असा तर्क लावून सरकारने मागासवर्गीयांची प्रगती रोखण्याचे काम आहे. या निर्णयाचा फटका आगामी सरळसेवा भरती, शिक्षक भरती आणि एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांना बसणार आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा."
- पुंडलिक मेश्राम कार्याध्यक्ष, ट्रायबल फोरम, अमरावती

English
हिंदी सारांश
Web Title : Backward class students' dreams shattered by shocking reservation decision.

Web Summary : Maharashtra's decision bars reserved category candidates, even with high scores, from open category jobs if they used any relaxations. This move sparks outrage, deemed unfair to meritorious backward class students and limits representation, hindering progress in government jobs.
टॅग्स :reservationआरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणSC STअनुसूचित जाती जमातीnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण