शहरं
Join us  
Trending Stories
1
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
2
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
3
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
4
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
5
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
6
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
7
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
8
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
9
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
10
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
11
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
12
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
13
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
14
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
15
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
16
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
17
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
18
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
19
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
20
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 17:24 IST

ST Bus Minister Pratap Sarnaik News: STला शासन किती प्रकारे मदत करते. इंधन दरवाढीचा फटका, ईव्हीसाठी चार्जिंग स्टेशनची कमतरता आणि एसटी तिकीट दरवाढीबाबत प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.

ST Bus Minister Pratap Sarnaik News: आधी दूध, मग सीएनजी आणि आता पेट्रोल-डिझेलची मोठी दरवाढ झालेली आहे. डिझेल दरवाढीमुळे सुमारे १२५ कोटींचा अतिरिक्त भार एसटी महामंडळावर येणार आहे. त्यामुळे आता एसटी बस तिकीट दरातही वाढ होणार का, याबाबत चर्चा सुरू असताना,  मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रताप सरनाईक यांनी ऑनलाइन बैठका घेतल्याची माहिती मिळाली आहे.  

माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, काही निर्णय हे कटू असले तरी ते आता घ्यावे लागतील. महागाई अशा पद्धतीने वाढत राहिली, तर महामंडळ जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी काही निर्णय आम्हाला घ्यावेच लागतील. १ लाख कामगारांचा पगार द्यायचा आहे. महामंडळाच्या सुविधाही सुरू राहिल्या हव्यात. १४ हजार २५० बस रस्त्यावर धावतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. 

शासनाकडून एसटीला किती पैसे मिळतात? सरनाईकांनी सगळे सांगितले

एसटी बस प्रवासात महिलांना जी सूट दिलेली आहे, त्याचे पैसे राज्य शासनाकडून आम्हाला मिळतात. दिव्यांग किंवा समाजातील काही घटकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. ते पैसेही राज्य शासन आम्हाला देत आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे, ते पैसे शासन देते. असे असले तरी शेवटी एसटी महामंडळाला सक्षमतेकडे वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून अजून किती पैसे घ्यायचे, ज्या ज्या वेळेस गरज पडते, तेव्हा आम्ही शासनाकडे पैसे मागतो. नवीन बस घ्यायच्या असतील, तर शासनाकडे पैसे मागतो. प्रत्येक गोष्टीसाठी शासन पैसे देते. एसटी स्टँड बांधणे, दुरुस्ती/सुधारणा करणे यासाठी पैसे आम्ही शासनाकडून घेतो. इतर सोयी-सुविधांसाठी शासन आम्हाला पैसे देते, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. 

२०३५ पर्यंत एसटीच्या सगळ्या बस इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार 

ज्या काही गोष्टी अपरिहार्य आहेत, त्यासाठी आम्हाला निर्णय घ्यावे लागणार आहेत. २०३५ पर्यंत एसटी महामंडळाच्या सगळ्या बस इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. आता आम्ही ८ हजार बस डिझेल घेतलेल्या आहेत. परंतु, भविष्यात इलेक्ट्रिक बस विकत घेण्यावरच भर राहणार आहे. सगळ्या इलेक्ट्रिक बस घेतल्या तरी त्याला चार्जिंग स्टेशन लागणार आहे. राज्यात एसटी महामंडळाच्या २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी निविदा प्रक्रिया करत आहोत, असेही सरनाईक म्हणाले.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिथे एमएमआरडीएचे पूल आहेत, पीडब्ल्यूडीचे आहेत, एमएसआरडीसीचे आहेत, काही महापालिकेचे पूल आहेत, त्याखाली ज्या जागा आहेत, तिथे गर्दुल्ले, भिकारी बसतात, अनधिकृत पार्किंग केले जाते. त्या जागा एसटी महामंडळाला दिल्या, तर तिथे आम्ही ईव्ही चार्जिंग स्टेशन आम्ही उभारू. जेणेकरून जनतेत हा संदेश जाईल की, चार्जिंग स्टेशन मोठ्या प्रमाणात राज्य शासनाचे आहेत. ईव्ही घ्यायला हरकत नाही, असे त्यांनी सांगितले.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : ST ticket price hike? Diesel costs burdening corporation, Sarnaik hints.

Web Summary : Rising diesel prices put a ₹125 crore burden on ST. Minister Sarnaik indicates ticket price increases may be unavoidable to sustain operations, pay employees, and maintain services. The government supports ST with subsidies, but self-sufficiency is crucial. The corporation aims for fully electric buses by 2035, establishing charging stations statewide.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकstate transportएसटीState Governmentराज्य सरकारFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलBus Driverबसचालकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर