शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शोभा डे यांच्या टि¦टवर संताप

By admin | Updated: June 4, 2014 00:47 IST

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देशभरातून शोकसंदेश येत असतानाच प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या टि¦टने मोठा वाद निर्माण केला. ‘

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि 
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देशभरातून शोकसंदेश येत असतानाच प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या टि¦टने मोठा वाद निर्माण केला. ‘बुरे दिन आ गए है फॉर द फॅमिली’ असे टि¦ट करून डे यांनी टि¦टरवर रोष ओढवून घेतला. भाजपा कार्यकत्र्यामध्येही संतापाची लाट पसरली. इतकेच नव्हे तर उत्तर भारतीय मोर्चाने संध्याकाळी केम्प्स कॉर्नर येथे डेंविरोधात जबरदस्त घोषणाबाजी केली. अखेर डे यांच्यावर माफी मागण्याची पाळी आली.
समाजातील घडामोडींवर प्रतिक्रिया देऊन नेहमीच प्रसिद्धीझोतात राहणा:या डे यांनी सकाळी अकराच्या सुमारास  मुंडेंच्या अपघाती निधनाबद्दल धक्का असल्याची प्रतिक्रिया टि¦टरवर व्यक्त केली. मात्र पुढे त्यांनी बुरे दिन आ गए फॉर द फॅमिली, असे लिहिले. त्यांचे हेच वाक्य उचलत टि¦टरवरून त्यांचा निषेध नोंदविण्यास सुरुवात झाली. डे यांची मानसिक स्थिती बिघडली आहे,  त्यांना ‘शोभा दे’ने वाली बात करो’, ऐसी बाते आपको ‘शोभा’ नही देती’, ‘त्यांना ताबडतोब मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता आहे’, ‘सांत्वन करता येत नाही, तर निदान दु:ख वाढवू नये’, अशा वेगवेगळ्या संतापजनक प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस टि¦टरवर पडला.  
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डे यांनी वादग्रस्त टि¦टनंतर  केम्प्स कॉर्नर येथील क्रॉसवर्ड येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचेही टि¦ट केले. टि¦टरवरील वादाच्या पाश्र्वभूमीवर मुंडेंच्या निधनाने आधीच दु:खी झालेल्या भाजपा कार्यकत्र्याकडून हिंसक प्रतिक्रिया उमटू शकेल या विचाराने पोलिसांनी क्रॉसवर्डभोवती बंदोबस्त ठेवला. हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता होणार होता. तो उशिरा सुरू झाला. मात्र त्याआधी भाजपाचे झेंडे हाती घेतलेले उत्तर भारतीय मोर्चाचे सुमारे साठेक कार्यकर्ते क्रॉसवर्डबाहेर जमले. त्यांनी डे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली,  शोभा डे हाय हाय, शोभा डे मुर्दाबाद, ‘पूरे देश मे शोर है, शोभा डे चोर है’ असे नारेही दिले. तसेच डे यांनी माध्यमांसमोर जाहीर माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. 
क्रॉसवर्डबाहेरील वातावरणात पसरत असलेला असंतोष लक्षात घेऊन डे यांनी कार्यक्रमाला येण्याचे टाळले. तसेच आयोजकांनीही त्यांचे नाव कार्यक्रमाच्या उपस्थितीतून काढून टाकले. याबद्दल आयोजकांना अधिक विचारले असता प्रतिक्रिया देण्याचे टाळले.  हा प्रकार लक्षात येताच अखेर सायंकाळी साडेसातच्या सुमारास डे यांनी टि¦टरवर  ‘माझा मुंडे कुटुंबीयांना दुखावण्याचा हेतू नव्हता. अनावधानाने माङयाकडून ती प्रतिक्रिया व्यक्त झाली. त्याबद्दल माफी असावी. मी मुंडे परिवाराच्या दु:खात सहभागी आहे,’ असे टि¦ट केले. 
 
‘माझा मुंडे कुटुंबीयांना दुखावण्याचा हेतू नव्हता. अनावधानाने माङयाकडून ती प्रतिक्रिया व्यक्त झाली. त्याबद्दल माफी असावी. मी मुंडे परिवाराच्या दु:खात सहभागी आहे, असे टि¦ट केले. मात्र डे यांची ही भूमिकाही उत्तर भारतीय मोर्चाने अमान्य केली. डे यांनी माध्यमांसमोर माफी मागावी या मागणीसाठी कार्यकर्ते हट्ट धरून होते.