शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नवाज शरीफ प्रकरणी शिवसेना लक्ष्य

By admin | Updated: May 25, 2014 05:30 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भारत भेटीच्या मुद्द्यावर शिवसेनेला सध्या दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.

मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भारत भेटीच्या मुद्द्यावर शिवसेनेला सध्या दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. शरीफ यांच्याबद्दल शिवसेना गप्प का, असा सवाल काँग्रेस पक्षाने केला आहे. तर, विरोध करणार्‍यांना जावेद मियाँदाद कसा चालतो, असा बोचरा सवाल मित्रपक्ष असणार्‍या भाजपानेच आज केला. शरीफ यांच्या भारत भेटीबद्दल शिवसेनेने अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. शरीफ यांच्या भारत भेटीस विरोध न करता शांत राहण्याचे धोरण शिवसेना नेत्यांनी स्वीकारल्याचे चित्र आहे. सरकार नवीन आहे, शरीफ आल्यावर बघू, अशी भूमिका सेना नेते व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानसोबत कसलेच संबंध नको, अशी भूमिका घेत शिवसेनेच्या कागदी वाघांनी पाकिस्तानी कलावंत आणि क्रीडापटूंना विरोध केला. मात्र, मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना स्वत:च्या शपथविधीचे निमंत्रण धाडले. यावर भाजपाकडून प्रतिक्रिया अपेक्षित नसली तरी किमान शिवसेना तरी त्यावर बोलेल, अशी अपेक्षा होती. परंतु, यासंदर्भात शिवसेनेने बाळगलेले मौन बघता पाकिस्तानबाबत त्यांची भूमिका केवळ राजकीय सोयीची होती, असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला. भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रित करणे अजिबात गैर नाही. मात्र, हीच भूमिका काँग्रेसने घेतली असती तर भाजप व शिवसेनेचा काय युक्तिवाद राहिला असता, असा प्रश्नही सावंत यांनी केला. मित्रपक्ष भाजपानेही आज शरीफ यांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय राजकारणाला स्थानिक संदर्भ जोडता येत नाहीत, असे सांगून तक्रार असल्यास थेट मोदींशी संपर्क साधण्याचा सल्लाही भंडारी यांनी शिवसेनेला दिला. (प्रतिनिधी)