शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा मनसेला दे धक्का!

By admin | Updated: June 1, 2014 01:19 IST

परिवहन निवडणुकांतील वादाचा वचपा काढण्यात सत्ताधारी शिवसेनेला यश आले असतानाच कार्यालयाचा ताबा घेण्यावरून मनसे आणि आघाडीत जुंपल्याचे दिसून आले .

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शनिवारी पार पडलेल्या अंदाजपत्रकाच्या महासभेत महापौर कल्याणी पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदी आघाडीचे सदस्य विश्वनाथ राणो यांच्या नावाची घोषणा करून मनसेकडील पद हिरावून घेतले. लोकसभा आणि परिवहन निवडणुकांतील वादाचा वचपा काढण्यात सत्ताधारी शिवसेनेला यश आले असतानाच कार्यालयाचा ताबा घेण्यावरून मनसे आणि आघाडीत जुंपल्याचे दिसून आले . 
केडीएमसीत कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने सुरुवातीला शिवसेनेने मनसेशी छुपी युती करून महापौर पद पटकावले होते, तर विरोधी पक्ष नेतेपद मनसेला बहाल केले होते. दरम्यान, महासभेत काँग्रेसचे गटनेते सचिन पोटे यांनी विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रेसचे सदस्य विश्वनाथ राणो यांचे नाव जाहीर करण्यात यावे, अशी मागणी केली होती. कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे महापौर पाटील यांनी स्पष्ट केले होते. 19(अ)प्रमाणो विरोधी पक्ष नेतापद जाहीर करण्याचे अधिकार महापौरांना असल्याने शनिवारच्या महासभेत निर्णय होण्याची शक्यता होती. आघाडीचे सदस्य राणो यांचे नाव जाहीर केले. त्यांचे नाव घोषित होताच मनसेच्या सदस्यांनी जोरदार हरकत घेतली. कोणत्या नियमांच्या आधारे हा निर्णय घेतला याचा खुलासा सचिव सुभाष भुजबळ यांनी करावा, असा सवाल विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला़ आघाडीला पद देण्याची कृती बेकायदेशीर असल्याचा आरोप करून मनसेने निषेध केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्वतंत्र गटनेते आहेत मग आघाडी कशी, कसा सवालही त्यांनी केला. मनसेचे म्हणणो फेटाळल्याने त्यांनी सभात्याग केला. 
 
च्दरम्यान, मंदार हळबे हे विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून राज ठाकरे यांच्या सभेला मार्गस्थ झाल्यानंतर कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या आघाडीच्या सदस्यांना टाळे दिसताच ते आक्रमक झाले. यावर काँग्रेसचे सदस्य सचिन पोटे, नवीन सिंग यांनी टाळा तोडण्याची भूमिका घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
 
च्या वेळी सचिव भुजबळ यांनाही चांगलेच फैलावर घेण्यात आले. आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्याकडे हे प्रकरण जाताच त्यांनी टाळे उघडण्याचे आदेश दिल़े परंतु हळबे यांनी त्यांच्या कर्मचा:यांमार्फत त्या कुलुपाची चावी पाठविल्याने वाद तूर्तास शमल्याचे दिसून आले.