शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

'त्या' फुटकळ लेखकाला भाजपातून हाकलून का दिलं नाही? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 7:40 AM

'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन शिवसेनेचा सवाल

मुंबई: 'नरेंद्र मोदी हेच शिवाजी' असे सांगणाऱ्या लेखकावर कारवाई का झाली नाही? पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. हे सर्व जाणूनबुजून करणाऱ्या फुटकळ लेखकाला भाजपातून एव्हाना हाकलून का दिले नाही?, असे प्रश्न शिवसेनेनं सामनामधून उपस्थित केले आहेत. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं आहे. ... तर भस्मसात व्हाल, मोदींवरील पुस्तकाच्या वादावरुन अमोल कोल्हेंचा संतापमहाराष्ट्रात एका पुस्तकावरून वाद पेटला आहे. त्या पुस्तकाशी भारतीय जनता पक्षाचा संबंध असल्याने वादात राजकारण घुसले, पण हे वादग्रस्त पुस्तक मागे घेतल्याचे भाजपने जाहीर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही, असे शेवटी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना जाहीर करावे लागले. अर्थात प्रश्न असा आहे की, भाजप म्हणते, लेखक गोयल याने पुस्तक मागे घेतले, पण हा उपटसुंभ गोयल म्हणतोय, 'छे, छे. मी पुस्तक मागे घेतले नाही, घेणार नाही.' आता नव्याने लेखक म्हणतो, मी पुस्तकाचे पुनर्लेखन करणार. म्हणजे गोंधळ सुरूच आहे. गोयल याला जे ओळखतात ते ठामपणे सांगू शकतात की, हा माणूस खोटय़ा प्रसिद्धीचा भुकेला आहे व यानिमित्ताने त्याला ती प्रसिद्धी मिळाली आहे. आणखी काही काळ त्याला ही प्रसिद्धी मिळू शकेल. गृहमंत्री अमित शहा यांनी आता असे जाहीर केले की, 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. अशा घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात पाठवू.' अशा वक्तव्यांमुळेही लोकांच्या भडकलेल्या भावना आणखी पेटत असतात. बरं, असे जर असेल तर भाजप कार्यालयात 'नरेंद्र मोदी हेच शिवाजी' असे सांगणाऱ्या लेखकावर त्याच कायद्याने कारवाई का झाली नाही?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?; जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना सवाल'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन वाद निर्माण होताच शरद पवारांना जाणता राजा म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्याचाही शिवसेनेकडून समाचार घेण्यात आला आहे. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हा वादाचा विषय आहे असे कुणाला वाटत नाही. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी लाजत मुरडत निषेध केला. तसा त्यांनी तो केला नसता तर त्यांची अवस्था बिकट झाली असती. त्यातल्या त्यात त्यांनी खेळ करण्याचा प्रयत्न केलाच. सुधीर मुनगंटीवार यांनी एक बाळबोध प्रश्न विचारला आहे, 'पवारांना जाणता राजा कसे म्हणता?' हा प्रश्न त्यांनी श्री. नरेंद्र मोदी यांनाच विचारायला हवा. छत्रपती शिवरायांना 'रयतेचा राजा' असे संबोधले जात असे. जनतेच्या प्रश्नांबाबत व भावनांबाबत खडान्खडा माहिती असलेला लोकनेता म्हणजे 'जाणता राजा' हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले. त्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील. पवार जाणता राजा कसे? असा प्रश्न उभा केल्याने आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून भडकलेल्या वादाची आग कमी होणार नाही. मधल्या काळात भाजपच्या काही नेत्यांच्या मागेही 'जाणते राजे' अशा उपाध्या हौसेने लावण्यात आल्या. पण कुठे शिवाजी राजे व कुठे हे सर्व हवशे नवशे गवशे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर तोफ डागली आहे.'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेनाशिवराय आणि नरेंद्र मोदींची तुलना करणाऱ्या पुस्तकामुळे वाद पेटताच भाजपाकडून सावरकरांच्या बदमानीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावरुनही शिवसेनेनं भाजपावर शरसंधान साधलं. चंद्रकांत पाटील यांनी या निमित्ताने वीर सावरकरांच्या बदनामीचा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवरायांच्या बदनामीवर जे चिडले ते वीर सावरकरांच्या बदनामीवर का भडकले नाहीत? पाटलांचा प्रश्न निरर्थक आहे. शिवसेनेने सावरकरांच्या संदर्भात ठाम भूमिका नेहमीच घेतली. नव्हे, फक्त शिवसेनेनेच घेतली. केंद्रात भाजपचे सरकार आहे. वीर सावरकरांना तत्काळ 'भारतरत्न' द्यावे, राष्ट्रपुरुषांच्या नामावलीत वीर सावरकरांना समाविष्ट करावे व वीर सावरकरांवर जो घाणेरडे विधान करील त्यावर खटले दाखल करण्याचे फर्मान केंद्रीय गृह मंत्रालयाने काढावे. हे करणार आहात का? सावरकरांची तुलनाही शिवरायांशी करता येणार नाही. वीर सावरकरांच्या संदर्भात शिवसेनेने घेतलेल्या ठाम भूमिकेच्या आसपासही कोणी फिरकू शकले नाही. शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी व शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर घणाघाती टीका केली आहे. 

टॅग्स :aaj ke shivaji narendra modi bookआज के शिवाजी नरेंद्र मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीchandrakant patilचंद्रकांत पाटीलSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरShiv Senaशिवसेना