महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, काँग्रेसच्या गोटात खळबळ; नेत्यांच्या हालचाली वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 08:28 PM2019-11-09T20:28:44+5:302019-11-09T20:40:25+5:30

काँग्रेसने थेट जयपूरलाच आमदारांना ठेवले असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवाना झाले आहेत. 

Shiv Sena, Congress Movements increased after bjp got invited to form government | महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, काँग्रेसच्या गोटात खळबळ; नेत्यांच्या हालचाली वाढल्या

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, काँग्रेसच्या गोटात खळबळ; नेत्यांच्या हालचाली वाढल्या

Next

मुंबई : शिवसेनेने मालाड येथील रीट्रीट हॉटेलमध्ये आमदारांना हलविले असून राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्याचे वृत्त आल्यानंतर लगेचच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची वर्दळ वाढली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने थेट जयपूरलाच आमदारांना ठेवले असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवाना झाले आहेत. 

शिवसेनेचे नेते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, गजानन कीर्तीकर, आदेश बांदेकर, एकनाथ शिंदे, रामदास कदम आदी नेते या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. या हॉटेलमध्ये ठेवलेल्या आमदारांशी ते संपर्क साधणार आहेत. 


काँग्रेसने त्यांच्या आमदारांना जयपूरला अज्ञातस्थळी हलविले असून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, निवडणूक प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण जयपूरला रवाना झाले आहेत. उद्या त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. 


तर राष्ट्रवादीने अद्याप असे कोणतेही पाऊल उचललेले नसून 12 नोव्हेंबरला शरद पवार आमदारांशी चर्चा करणार आहेत. 

Web Title: Shiv Sena, Congress Movements increased after bjp got invited to form government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.