आनंदराज आंबेडकरांवर शिवसैनिकांचा हल्ला

By Admin | Updated: June 17, 2015 02:54 IST2015-06-17T02:54:05+5:302015-06-17T02:54:05+5:30

रिपब्लिकन सेनेचे तथा बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यावर मंगळवारी सकाळी महाडमध्ये शिवसैनिकांनी

Shiv Sainik attack on Anandraj Ambedkar | आनंदराज आंबेडकरांवर शिवसैनिकांचा हल्ला

आनंदराज आंबेडकरांवर शिवसैनिकांचा हल्ला

महाड : रिपब्लिकन सेनेचे तथा बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यावर मंगळवारी सकाळी महाडमध्ये शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी महाड शिवसेना आमदार भरत गोगावले यांचे पुत्र, युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांच्यासह पंधरा जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटण्याचे संकेत मिळत आहेत. आपल्यावरील शिवसैनिकांनी केलेला हा हल्ला पूर्वनियोजित असून ज्या भूमीत डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले त्याच महाडमध्ये दलितांवर झालेला हा भ्याड हल्ला निंदनीय असल्याची प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी दिली.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा वाद या हल्ल्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच आंबेडकर समर्थकांनी महाडकडे धाव घेतली. (वार्ताहर)

Web Title: Shiv Sainik attack on Anandraj Ambedkar